जिल्ह्यात शनिवारी राष्ट्रीय लोकअदालत

जिल्ह्यात शनिवारी राष्ट्रीय लोकअदालत
Published on

जिल्ह्यात शनिवारी
‘राष्ट्रीय लोक अदालत’
रत्नागिरी, ता. ७ ः जिल्हा विधी प्राधिकरणातर्फे शनिवारी (ता. ९) जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील तालुका न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे. या न्यायालयामध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी खटले, कौटुंबिक वाद, चेक बाऊन्स, दिवाणी वाद, वाद दाखलपूर्व प्रकरणांतर्गत विद्युत कंपनी, बँका, पतसंस्थांचे थकीत कर्जाबाबतची दाखलपूर्व प्रकरणे, तसेच नगरपालिका, ग्रामपंचायत थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीची मामलेदार कोर्टात प्रलंबित वाद अशी प्रकरणे ठेवण्यात आली आहेत. नागरिकांनी या लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी केले आहे. पक्षकारांनी त्यांची प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवण्याकरिता आपले वकील, संबंधित न्यायालय अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आर. आर. पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com