

-rat८p७.jpg-
26O42182
चिपळूण ः उद्योजक डॉ. सतीश वाघ यांचा सत्कार करताना आमदार शेखर निकम.
सावर्डेत क्रीडा अन् संशोधनला नवे व्यासपीठ
सह्याद्री शिक्षणसंस्थेचा पुढाकार; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ ः सह्याद्री शिक्षणसंस्थेच्यावतीने चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे उभारण्यात आलेल्या ‘सह्याद्री जिम्नॅशियम’ आणि ‘गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी’ मधील अत्याधुनिक रिसर्च लॅबचे दिमाखदार उद्घाटन संपन्न झाले. ‘सुप्रिया लाइफ सायन्सेस’चे अध्यक्ष डॉ. सतीश वाघ यांच्या हस्ते या दोन्ही सुविधांचे लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमामुळे कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाच्या शैक्षणिक आणि क्रीडा सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
विद्यार्थ्यांचा केवळ बौद्धिकच नव्हे तर शारीरिक आणि मानसिक विकास व्हावा, या उद्देशाने या आधुनिक जिम्नॅशियमची निर्मिती करण्यात आली आहे. बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ आणि कॅरम या खेळाच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत. अत्याधुनिक मशिनने सुसज्ज अशी अद्ययावत व्यायामशाळा सुरू होत आहे. गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये सुरू करण्यात आलेली ‘रिसर्च लॅब’ (संशोधन प्रयोगशाळा) औषधनिर्मिती आणि विज्ञानक्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मैलाचा दगड ठरेल. आधुनिक उपकरणांनी सज्ज असलेली ही लॅब विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देऊन भविष्यातील शास्त्रज्ञ घडवण्यास मदत करेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
सर्व मान्यवरांनी जिम्नॅशियम व प्रयोगशाळेची प्रत्यक्ष पाहणी करून कौतुक केले. या सोहळ्याला संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत निकम, उपाध्यक्षा युगंधरा राजेशिर्के, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, संचालक गुलाब सुर्वे, हरिश्चंद्र सुर्वे यांच्यासह शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
------
कोट
‘सह्याद्री शिक्षणसंस्था कोकणातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण देण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. जिम्नॅशियम व रिसर्च लॅबची उभारणी हा त्याच ध्येयपूर्तीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
- शेखर निकम, आमदार तथा अध्यक्ष, सह्याद्री शिक्षणसंस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.