‘बांदा दिव्यज्योती’चा निकाल ९६.७७ टक्के

‘बांदा दिव्यज्योती’चा निकाल ९६.७७ टक्के
Published on

swt८२१.jpg मध्ये फोटो आहे.
स्वरा सातार्डेकर, समृद्धी परब, खुशी शेख

‘बांदा दिव्यज्योती’चा निकाल ९६.७७ टक्के
बांदा : येथील दिव्यज्योती इंग्लिश मिडीयम प्रशालेचा दहावीचा निकाल ९६.७७ टक्के लागला. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचे नाव उंचावले आहे. यामध्ये स्वरा सातार्डेकर हिने ९४.२० टक्के गुण मिळवून प्रशाळेतून प्रथम येण्याचा मान पटकावला. समृद्धी परब हिने ९३.४० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर ख़ुशी शेख हिने ९२.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. यावर्षी प्रशाळेतून दहावीच्या परीक्षेसाठी एकूण ३१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते, पैकी १९ विद्यार्थी विशेष प्रविण्य श्रेणीत, ८ विद्यार्थी प्रथम श्रेणित तर ३ विद्यार्थी द्वितीय श्रेणित उत्तीर्ण झालेत. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रॉबिन, व्यवस्थापक फादर लिजो, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
--------
42231
विनय कोन्डोस्कोप, चैताली वरक, बाळकृष्ण शिंदे

डेगवे प्रशालेचा निकाल १०० टक्के
बांदा : माध्यमिक विद्यालय डेगवे प्रशालेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रशालेतून विनय नागराज कोन्डोस्कोप (९३.२० टक्के), चैताली लक्ष्मण वरक (८५.८०), बाळकृष्ण रामदास शिंदे (८५.४०) टक्के हे विद्यार्थी प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेच्या अध्यक्षा कल्पना तोरसकर, कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर, सचिव संतोष सावंत, खजिनदार वैभव नाईक, समन्वय समिती सचिव सौ रश्मी तोरसकर, सहसचिव नंदकुमार नाईक आदींनी अभिनंदन केले.
----------
इन्सुली नूतन विद्यालयाचा निकाल ९७.८७ टक्के
बांदा : विद्या विकास मंडळ इन्सुली संचलित नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुलीचा दहावीचा निकाल ९७.८७ टक्के लागला. प्रशाळेतून गौरंगी गणेश राणे ९२.४० टक्के, नूजत नासिर शेख ९० टक्के, सुस्मिता सुनील सावंत ८९.२० टक्के, आर्या गणपत सावंत ८८.४० टक्के, अपूर्वा दिगंबर मोरजकर ८७.२० टक्के हे विद्यार्थी पहिल्या पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेत. एकूण ४७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com