

42260
मुफ्ती सरफराज मुकादम, यासीन खान, अब्दुल समद खाजी
दहावीच्या परीक्षेमध्ये
वडील-मुलीची भरारी
‘मदरसा फलाहे उम्मत’चे यश
कुडाळ, ता. ९ : दहावीच्या परीक्षेत मदरसा फलाहे उम्मतची उज्ज्वल परंपरा कायम ठेवत १०० टक्के निकाल लागला. मुफ्ती सरफराज मुकादम हे या मदारशाचे व्यवस्थापक असून वयाच्या ४८ व्या वर्षी यंदाच्या दहावीच्या परीक्षेला बसले होते. शिक्षणाची प्रबळ आवड आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी ७३.८० टक्के गुण प्राप्त केले. तसेच त्यांच्या मुलीनेही यंदाच्या दहावीच्या परीक्षेत ७८ टक्के गुण मिळवले.
मदरसा फलाहे उम्मत हा मदरसा मागील १८ वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी, गोंधयाळे, कुडाळ या गावात सुरू असून हा मदरसा जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना कुरआन पठणासह धार्मिक शिक्षण देण्याचे कार्य करत आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून मदरशात पाचवी ते दहावीपर्यंतचे शालेय शिक्षणही सुरू केले आहे. मदरसा फलाहे उम्मत या संस्थेने यंदाही दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यामध्ये मुफ्ती सरफराज मुकादम यांनी ७३.८० टक्के गुण मिळवत विशेष यश मिळविले. तसेच यासीन खान यांनी ६७ टक्के, तर अब्दुल समद खाजी यांनी ६२.८० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होत संस्थेचे नाव उज्ज्वल केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.