जिमखाना क्रीडा संकुलाची केसरकर यांच्याकडून पाहणी

जिमखाना क्रीडा संकुलाची
केसरकर यांच्याकडून पाहणी
Published on

42408
सावंतवाडी ः जिमखाना मैदान येथील क्रीडा संकुलाच्या कामाची आमदार दीपक केसरकर यांनी पाहणी केली.

जिमखाना क्रीडा संकुलाची
केसरकर यांच्याकडून पाहणी
सावंतवाडी ः माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी जिमखाना मैदान येथील क्रीडा संकुलाच्या कामाचा पाहणी केली. नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांच्यासह क्रीडा अधिकारी यावेळी उपस्थित होते. परिपूर्ण असे क्रीडा संकुल उभे करणार असल्याचा विश्वास यावेळी श्री. केसरकर यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘इन डोअरसह आऊट डोअर क्रीडा प्रकारही इथे उपलब्ध असणार आहेत. मुलांमध्ये क्रीडा प्रकारांची आवड निर्माण होण्यासाठी नगरपरिषदेच्या सहकार्यातून प्रयत्न केले जाणार आहेत.’’ यावेळी क्रीडा अधिकाऱ्यांकडून श्री. केसरकर यांनी कामाचा आढावा घेतला. याप्रसंगी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, युवराज लखमराजे भोसले, क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, मोहिनी मडगावकर, सुनिता पेडणेकर, सार्वजनिक बांधकाम अभियंता पूजा इंगवले, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, पालिकेचे सार्वजनिक बांधकाम अभियंता तुषार सरडे, उप अभियंता सीमा गोवेकर, अर्चित पोकळे, प्रसाद नार्वेकर आदी उपस्थित होते.
-------
आंबोलीत उद्या हिंदू संमेलन
आंबोली : आंबोली, चौकुळ आणि गेळे या तीनही गावांतील सकल हिंदू समाजाच्यावतीने मंगळवारी (ता. १२) येथे ‘हिंदू संमेलन’ होणार आहे. यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यासह अनेक दिग्गज वक्ते उपस्थित राहणार आहेत. हे संमेलन कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाचे किंवा संघटनेचे नसून ‘सकल हिंदू समाज’ या भावनेतून आयोजित केले आहे. ‘‘सर्व व्यक्तींनी आपला पक्ष, पद आणि प्रतिष्ठा बाजूला ठेवून केवळ एक हिंदू म्हणून या सोहळ्यात सहभागी व्हावे,’’ असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात दुपारी ३.३० वाजता श्रीराम मंदिर, बाजारवाडी येथून होईल. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत श्रीराम मंदिर ते श्री देवी माऊली मंदिर अशी भव्य शोभायात्रा काढण्यात येईल. सायंकाळी ६ वाजता मुख्य संमेलनाला सुरुवात होईल. यावेळी प्रमुख वक्ते आमदार लांडगे यांच्यासह मालवणचे डॉ. पंकज दिघे, आंबोलीची सुकन्या सायली गावडे यांचेही प्रबोधनात्मक व्याख्यान यावेळी होणार आहे. या सोहळ्यात सहकुटुंब सहभागी व्हावे, असे आवाहन सकल हिंदू समाज आंबोली-चौकुळ-गेळे यांच्यावतीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com