आमदार निकम चषक स्पर्धेनिमित्त सोडत

आमदार निकम चषक स्पर्धेनिमित्त सोडत
Published on

आमदार निकम चषक
स्पर्धेनिमित्त सोडत
चिपळूण : शेखर निकम प्रतिष्ठान आयोजित आमदार चषक स्पर्धेनिमित्त उद्योजक सचिन पाकळे यांनी ३०० कूपन खरेदी करून लकी ड्रॉमध्ये सहभाग घेतला होता. या सोडतीत त्यांच्या कंपनीच्या नावावर मोटारसायकल लागली; मात्र, ही मोटारसायकल स्वतःकडे न ठेवता कामगारांना देण्याचा निर्णय घेतला. आमदार शेखर निकम यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली. कामगारांमधून काढलेल्या या विशेष लकी ड्रॉमध्ये एका भाग्यवान कामगाराला मोटारसायकल प्रदान करण्यात आली. याशिवाय मिक्सर, कूकर, हॉटपॉट, स्टील डबे, पाण्याच्या टाक्या, टॉर्च, इस्त्री, ब्लूटूथ स्पीकर, गॅस शेगडी, सीलिंग पंखा आदी वस्तूंचेही वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला उद्योगपती सचिन पाकळे, पुनम पाकळे, अशोक काजरोळकर, देवराज गरगरटे, सतीश सावर्डेकर, राजेश सुर्वे, विकास भंडारी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com