दर्जेदार रस्त्याचा प्रवास पाटगाव घाटीत होतोय जीवघेणा!

दर्जेदार रस्त्याचा प्रवास पाटगाव घाटीत होतोय जीवघेणा!
Published on

-rat९p४०.Jpg-
P26O42404
देवरूख ः पाटगाव घाटातील अरुंद रस्ता.
---
पाटगाव घाटातील प्रवास जीवघेणा
देवरूख-पांगरी राज्यमार्ग; रुंदीकरण रखडले
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. ९ ः पाटगाव घाटीतील रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित आहे. एकीकडे या मार्गावरील इतर कामांचा दर्जा उत्तम असताना, केवळ पाटगाव घाटात रुंदीकरण रखडल्याने प्रवाशांना अपघाताच्या छायेत प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे, जमिनीचा वाद मिटूनही सार्वजनिक बांधकाम विभाग नेमकी कशाची वाट पाहत आहे, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
चार वर्षांपूर्वी या राज्यमार्गाचे काम करण्यात आले होते. या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या चार वर्षांत या रस्त्यावर एकही खड्डा पडलेला नाही, जे रस्ते कामाच्या उच्चदर्जाचे प्रतीक मानले जाते; मात्र, संपूर्ण रस्ता सुस्थितीत असताना केवळ पाटगाव घाटातील काही अंतर आजही अरुंद आहे. या अरुंद वळणांमुळे येथे छोटे-मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.
या घाटातील रस्ता रुंदीकरणाला एका जमीन मालकाने आक्षेप घेतला होता. त्यामुळे हे काम थांबवण्यात आले होते; मात्र, हा विषय कायदेशीररीत्या किंवा सामोपचाराने मिटल्यानंतरही बांधकाम विभागाने अद्याप कामाला सुरुवात केलेली नाही. घाटीच्या वरील भागातील ग्रामस्थ गेल्या दोन वर्षांपासून या विषयावर सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदने देत आहेत. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वेळोवेळी आंदोलनाचे इशारेही देण्यात आले; परंतु अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
----
कोट
आम्ही सतत पाठपुरावा करूनही बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. रस्ता चांगला झाला आहे; पण या घाटीत गाडी चालवताना जीव मुठीत धरावा लागतो. जर लवकर काम सुरू झाले नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन छेडण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

- वैभव यादव, ग्रामपंचायत सदस्य, निवेबुद्रुक
-------------
कोट
पाटगाव घाटीतील रस्ता रुंदीकरणाच्या कामात असलेले अडथळे आता दूर झाले आहेत. या कामाचे गांभीर्य लक्षात घेता लवकरच रुंदीकरणाचे काम प्रत्यक्ष हाती घेण्यात येईल.
--वैभव जाधव, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, देवरूख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com