ओटवणे हायस्कूलची मानसी प्रथम

ओटवणे हायस्कूलची मानसी प्रथम
Published on

42545
मानसी वारंग, गिरीश वर्णेकर, सदिच्छा गावकर, सुरभी गावकर

ओटवणे हायस्कूलची मानसी प्रथम
ओटवणे ः येथील रवळनाथ विद्यामंदिरचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ९५.८३ टक्के लागला. या परीक्षेला बसलेल्या २४ पैकी २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मानसी वारंग (८६.२०) हिने प्रथम, गिरीश वर्णेकर (८५ टक्के) याने तृतीय तर सदिच्छा गावकर व सुरभी गावकर (८४ टक्के) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विशेष श्रेणीत ६ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत १० तर द्वितीय श्रेणीत ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वामन कविटकर, उपाध्यक्ष बाबाजी गावकर, सचिव राजाराम वर्णेकर, मनोहर मयेकर, सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक राजेंद्र देसाई, शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
.................
42546
विलवडे विद्यालयाचा १०० टक्के निकाल
ओटवणे ः विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला.   या परीक्षेला बसलेले सर्व ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गोविंद दळवी याने ८८.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय सलोनी गवस (८७ टक्के), तृतीय क्रमांक जान्हवी नाईक (८४.६०) हिने पटकाविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे विलवडे ग्रामोन्नती मंडळ (मुंबई) अध्यक्ष संभाजी दळवी, उपाध्यक्ष दिलीप दळवी, सचिव सूर्यकांत दळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रफुल्ल सावंत, सरपंच प्रकाश दळवी, सोनू दळवी, मुख्याध्यापक बुद्धभूषण हेवाळकर व शिक्षक, कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com