राखूया मनाचे आरोग्य

राखूया मनाचे आरोग्य
Published on

rat10p1.jpg- -
42591
डॉ. स्नेहल तोडकर-अंधारे

राखूया मनाचे आरोग्य .........लोगो

इंट्रो

आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक युगात मानसिक आरोग्याच्या समस्या वेगाने वाढत आहेत. यामध्ये ''ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसॉर्डर'' म्हणजेच ओसीडी (OCD) या आजाराचे प्रमाण आणि स्वरूप यात मोठे बदल जाणवत आहेत. ओसीडी हा एक मानसिक आजार आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या मनात नको असलेले विचार (Obsessions) वारंवार येतात. हे विचार थांबवण्यासाठी किंवा त्यातून निर्माण होणारी भीती कमी करण्यासाठी व्यक्ती ठराविक कृती (Compulsions) पुन्हा पुन्हा करते. उदा. हात धुणे, दरवाजे नीट लावले आहेत का हे तपासणे किंवा मनातल्या मनात आकडे मोजणे.
- डॉ. स्नेहल तोडकर-अंधारे रत्नागिरी
एमबीबीएस, डी.पी.एम., एमआयपीएस

--

तुमचा फोन तुम्हाला वापरतोय की, तुम्ही फोनला?

आजच्या काळात ओसीडीचे प्रमाण खूप वाढले आहे. त्याचे कारण आधुनिक जीवनशैली आहे. हे प्रमाण वाढण्याची कारणे आपल्या नेहमीच्या व्यवहारात आहेत हे पुढील मुद्द्यावरून लक्षात येईल.

* माहितीचा अतिरेक (Information Overload) ः इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे आपल्यावर सतत माहितीचा मारा होत असतो.
* जीवनशैलीचे डिजिटलायझेशन ः सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण एका अदृश्य ''डिजिटल'' जाळ्याशी जोडलेले असतो.
* FOMO (Fear Of Missing Out): जगाच्या मागे पडण्याची किंवा एखादी महत्त्वाची अपडेट चुकण्याची भीती.

डिजिटल ओसीडी (Digital OCD) ही आधुनिक काळातील एक मानसिक समस्या आहे, जी तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे आणि त्यावरील आपल्या अवलंबित्वमुळे निर्माण झाली आहे. आपण सर्वच फोन वापरतो; पण जेव्हा ही कृती ''अनिवार्यता'' (Compulsion) बनते तेव्हा तो ओसीडीचा भाग असतो.

मुख्य लक्षणे :
* सतत नोटिफिकेशन्स तपासणे (Checking Compulsions) ः कोणताही मेसेज आलेला नसतानाही दर दोन-दोन मिनिटांनी फोनची स्क्रीन अनलॉक करून पाहणे. मेसेजला रिप्लाय आला का, हे दर मिनिटाला चेक करणे,
* ई-मेल आणि मेसेजेसचे वाचन ः पाठवलेला मेसेज व्यवस्थित आहे का, त्यात काही चूक तर नाही ना, हे पाहण्यासाठी तोच मेसेज पुन्हा पुन्हा वाचणे.
* टॅब्स आणि ॲप्स बंद करणे ः ब्राउझरमधील सर्व टॅब्स एका विशिष्ट क्रमाने बंद करणे किंवा फोनमधील ''बॅकग्राउंड ॲप्स'' वारंवार क्लिअर करणे.
* फोटो आणि गॅलरीचे व्यवस्थापन ः गॅलरीमधील फोटो परफेक्ट असावेत यासाठी ते वारंवार सॉर्ट करणे, नको असलेले फोटो डिलीट करण्याचा अतिआग्रह धरणे किंवा फोटो बॅकअप झाला आहे की, नाही हे सतत तपासणे.

यावर उपाय काय?
* तज्ज्ञांचा सल्ला ः थेरपी: CBT & ERP द्वारे यावर यशस्वी उपचार होऊ शकतात.
* Rule of १० : फोन तपासण्यापूर्वी स्वतःला १० सेकंद थांबवा आणि विचारा, "हे तपासणे आत्ता खरोखर गरजेचे आहे का0"
* डिजिटल उपवास ः आठवड्यातून एक दिवस किंवा दिवसातून काही तास फोन पूर्णपणे बंद करून ठेवा.
ओसीडी ही लपवण्याची गोष्ट नाही. आजच्या काळात वाढलेला हा ताणतणाव वेळीच ओळखणे आणि त्यावर योग्य उपचार घेणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्य जपले तरच आपण या आधुनिक काळातील आव्हानांचा सामना करू शकू.

(लेखक सुवर्णपदकप्राप्त मानसोपचारतज्ञ , व्यसनमुक्तीतज्ञ व समुपदेशक आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com