

- rat११p५.jpg-
26O42780
राजापूरमधील नुकसानीची पाहणी करताना आमदार किरण सामंत.
नुकसानीचे पंचनामे तातडीने करा
किरण सामंत ः राजापुरातील बाधित घरांची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ११ : वादळी पावसाने राजापूर आणि लांजा तालुक्यात प्रचंड धुमाकूळ घातला. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक घरांवरील पत्रे उडाली, महाकाय झाडे उन्मळून पडली तर वीजवाहिन्या तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतपिकांचेही यात मोठे नुकसान झाले असून, या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी धाव घेतली.
वादळाची तीव्रता लक्षात घेता आमदार सामंत यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत बाधित क्षेत्रांची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी त्यांनी नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. ‘शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,’ अशी ग्वाही त्यांनी दिली. नुकसानीची भीषणता पाहता आमदार सामंत यांनी लांजा आणि राजापूरच्या तहसीलदारांना तातडीने घटनास्थळांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. नुकसानग्रस्तांना शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी यासाठी महसूल विभाग, ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. वादळामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. हा पुरवठा पूर्ववत करण्यासाठी त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक त्या सूचना दिल्या. आमदार स्वतः प्रत्यक्ष जमिनीवर उतरून परिस्थिती हाताळत असल्याने स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. सार्वजनिक मालमत्ता, घरे आणि शेतीचे झालेले नुकसान शासनदरबारी प्रभावीपणे मांडून बाधितांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही सामंत यांनी या वेळी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.