

42808
एकात्मतेतून मानवतेच्या नात्याची विण
आंबडोसमध्ये स्नेहसंमेलन; विविध स्पर्धांमध्ये ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ११ ः गाव म्हणजे केवळ भौगोलिक सीमा नव्हे, तर माणुसकीच्या नात्यांनी विणलेले एक कुटुंब असते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आंबडोस गावाने दिला आहे. संस्कारांची शिदोरी, परंपरांची जपणूक आणि एकजुटीची परंपरा जपणाऱ्या या गावात ७ ते १० मे या कालावधीत आंबडोस ग्रामविकास मंडळ मुंबई या मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या निमित्ताने गाव पुन्हा एकदा नात्यांच्या उबदार साखळीत गुंफलेले दिसून आले.
गावाशी असलेली नाळ कायम ठेवत, मुंबईसह विविध ठिकाणी वास्तव्यास असलेले आंबडोसवासीय या स्नेहबंधात तितक्याच आपुलकीने सहभागी होताना दिसतात. मंडळाचे स्नेहसंमेलन ७ ते १० मे या कालावधीत गावात रंगले. ग्रामदेवता श्री देव रवळनाथ वर्धापन दिन बुधवारी (ता. ६) उत्साहात झाल्यानंतर मंगळागौर, मिनी मॅरेथॉन, स्लो सायकलिंग, पुरुष आणि महिला क्रिकेट स्पर्धा, रस्सीखेच स्पर्धा, वयानुसार मॅरेथॉन, वक्तृत्व आदी स्पर्धांना ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रतिसाद दिला. ‘आदर्शवाडी स्पर्धा’ या विशेष उपक्रमाचेही आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये स्वच्छता, एकजूट, पर्यावरण संवर्धन आणि सामूहिक सहभाग यांना महत्त्व होते. या स्पर्धेला प्रत्येक वाडीमध्ये सकारात्मक पद्धतीने साथ लाभली. त्याचा समारोप रविवारी (ता. १०) बक्षीस वितरणाने झाला. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकात्मकतेची भावना दृढ झाली.
................
पावणवाडी ‘आदर्शवाडी’
स्नेहसंमेलनाचे मुख्य आकर्षण असलेले आदर्शवाडी स्पर्धेचा मान पावणवाडी या वाडीने मिळविला. सर्वाधिक यश मिळवित या वाडीने आदर्शवाडीचा किताब पटकावला. महात्मा फुलेनगरवाडी सुंदरवाडी स्पर्धेत उपविजेती, मंगळागौर स्पर्धेत गावठणवाडी संघाने विजेते, कदमवाडी उपविजेता, महिला क्रिकेटमध्ये टेंबवाडी सप्तरंग संघ विजेता, याच वाडीतील नवदुर्गा संघ उपविजेता ठरला. पुरुष क्रिकेटमध्ये आई भवानी विजेता, संजय स्मृती मालवण देऊळवाडा उपविजेता, महिला रस्सीखेच-गावठणवाडी विजेती, टेंबवाडी उपविजेती. पुरुष रस्सीखेच-टेंबवाडी विजेती, गावठवाडी उपविजेती. ५५ वर्षांवरील पुरुष मॅरेथॉन-वासुदेव वरवडेकर विजेते, विनोद धुरी उपविजेते. ३६ ते ५५ वयोगट मॅरेथॉन-सचिन परब विजेते, प्रशांत नाईक उपविजेते. ३५ वर्षांखालील स्पर्धा-प्रमोद कदम विजेते, साईश करावडे उपविजेते. महिला मॅरेथॉन ः ३५ वर्षेखालील-कृतिका परबत विजेती, रिया परब उपविजेती. ३५ वर्षांवरील-मानसी परब विजेती, महानंदा मुंबरकर उपविजेती. अध्यात्मिक वक्तृत्व ः २० वर्षांवरील-संचिता परबत, २० वर्षांखालील-भार्गव नाईक. स्लो सायकलिंग-आयुष कांबळे विजेता, नंदकिशोर परब उपविजेता.
---
प्रत्येक उपक्रम भावनिक सोहळा!
निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले आणि स्वच्छतेत आदर्श ठरलेले आंबडोस गाव, केवळ सौंदर्याने नव्हे तर सामाजिक बांधिलकीनेही वेगळेपण जपते. स्वच्छता अभियानात अव्वल स्थान मिळवून तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते झालेला सन्मान हा गावाच्या एकजुटीचा आणि सामूहिक प्रयत्नांचा दिमाखदार पुरावा आहे. त्यामुळेच येथे प्रत्येक उपक्रम हा केवळ कार्यक्रम राहत नाही, तर तो एक भावनिक सोहळा ठरतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.