उत्सवी नाट्य स्पर्धेत ६० हून अधिक नाटकांची मांदियाळी

उत्सवी नाट्य स्पर्धेत ६० हून अधिक नाटकांची मांदियाळी
Published on

-rat११p२.jpg-
P26O42777
रत्नागिरी ः कोंडवी येथील पंढरीनाथ नाट्यमंडळाने नाट्यस्पर्धेत सादर केलेल्या ती एक अपूर्ण संध्याकाळ या नाटकातील क्षण.
-----------
नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती नाट्य स्पर्धा---लोगो

उत्सवी नाट्य स्पर्धेने ग्रामीण कलाकारांना व्यासपीठ
यंदा ६०हून अधिक नाटकांची मांदियाळी : जुन्या संहिताही नव्या स्वरूपात

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः ग्रामीण भागातील कलाकारांनी रंगभूमीकडे वळावे, या उद्देशाने अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे आयोजित दिवंगत नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्यस्पर्धा रंगतदार ठरत आहे. यावर्षी या स्पर्धेत ६० हून अधिक नाटके सादर होण्याची चिन्हे आहेत.
गतवर्षी या स्पर्धेत ४७ नाटकांचे सादरीकरण झाले होते. यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू झालेली स्पर्धा ३१ मेपर्यंत चालणार असून, आतापर्यंत ५३ नाटके रंगली आहेत. आयोजकांच्या मते, हा आकडा साठच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात उत्सवांमध्ये नाटकांची समृद्ध परंपरा असली तरी अनेक कलाकारांना स्पर्धात्मक रंगभूमीवर येण्याची संधी मिळत नव्हती. ही उणीव भरून काढण्यासाठी ही स्पर्धा सुरू करण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून रत्नागिरीतील रंगकर्मींची संख्या वाढताना दिसत आहे. नव्या पिढीतील लेखक, दिग्दर्शक, अभिनेते-अभिनेत्री तसेच तंत्रज्ञ मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभागी होत आहेत. स्पर्धेत सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक तसेच प्रायोगिक रंगभूमीवरील विविध विषयांची नाटके सादर होत आहेत. नव्याने लिहिलेल्या संहितांसह ८०च्या दशकातील जुन्या संहितांचेही प्रभावी सादरीकरण पाहायला मिळत आहे.
----
खंडित परंपरा पुन्हा सुरू
काही गावांमध्ये खंडित झालेली नाट्यपरंपरा या स्पर्धेमुळे नव्या जोमाने पुन्हा सुरू झाल्याचे चित्र आहे. या स्पर्धेमुळे केवळ कलाकारच नव्हे तर उत्तम रसिक घडवण्याचे कामही घडत असल्याचे दिसून येत आहे. नाट्यगृहांमध्ये प्रेक्षकांची कमतरता असल्याची चर्चा होत असताना उत्सवी नाटकांना मात्र रसिकांची भरघोस उपस्थिती लाभत आहे.
---
राज्य नाट्यस्पर्धेतही वाढ
उत्सवी नाट्यस्पर्धेमुळे कलाकारांचा आत्मविश्वास वाढला असून, राज्यशासनाच्या हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धेतही सहभागात दुपटीने वाढ झाली आहे. १८० दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत सहभागी संघांना सन्मानचिन्ह तर प्रत्येक कलाकाराला प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येते, अशी माहिती नाट्य परिषदेचे समीर इंदुलकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com