-कोंड्येतील सम्राट अशोकनगरचा पाण्यासाठी टाहो

-कोंड्येतील सम्राट अशोकनगरचा पाण्यासाठी टाहो
Published on

पाणीटंचाईने सम्राट अशोकनगर हैराण
टँकर सुरू होण्याची प्रतीक्षा ; प्रशासनाकडे डोळे
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ११ ः मागील काही दिवसांपासून वाढणाऱ्या तापमानामुळे नैसर्गिक जलस्रोतांमधील पाणीपातळीत घट होत आहे. तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. यामध्ये गतमहिन्यात कोंड्ये येथील सम्राट अशोकनगरला टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी पंचायत समितीकडे करण्यात आली आहे; मात्र, अद्यापही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालेला नसल्याने येथील ग्रामस्थांना हजारो रुपये खर्च करून खासगी टँकरकडून पाणी विकत घ्यावे लागत आहे.
कोंड्ये येथील सम्राट अशोकनगरला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी गतमहिन्यात केली आहे. याला सुमारे वीस ते पंचवीस दिवसांचा कालावधी उलटला तरी येथील ग्रामस्थांना पंचायत समिती प्रशासनाकडून अद्यापही टँकरद्वारे पाणीपुरवठा केलेला नाही. या संबंधित पंचायत समिती प्रशासनाशी संपर्क साधला असता कोंड्ये येथील ग्रामस्थांच्या टँकरद्वारे पाणीपुरवठ्याच्या मागणीच्या अनुषंगाने स्थळ पाहणी करण्यासाठी तहसीलदार यांना अहवाल पाठवण्यात आला आहे; मात्र, त्यानुसार अद्यापही टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा अहवाल प्राप्त झालेला नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. सद्यःस्थितीमध्ये पाणीटंचाईची तीव्रता अधिक वाढली असली असून, प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा न झाल्याने पाणीपुरवठ्यासाठी खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली.
---
राजापूरचा टॅंकर लांज्यांच्या ताब्यात
राजापूर पंचायत समितीचा टँकर लांजा पंचायत समितीला देण्यात आलेला असून, गेल्या तीन-चार वर्षापासून राजापूर पंचायत समितीचा टँकर लांजा पंचायत समितीच्या ताब्यात आहे. हा टँकर पुन्हा राजापूर पंचायत समितीला मिळावा, अशा मागणीचा ठराव येथील पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीमध्ये यापूर्वी करण्यात आला आहे. या मागणीच्या ठरावाप्रमाणे अद्यापही राजापूर पंचायत समितीला टँकर मिळालेला नाही.

कोट
कोंड्ये येथील सम्राट अशोकनगरला पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. वीस-पंचवीस दिवसांपूर्वी पंचायत समितीकडे टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणीही करण्यात आलेली आहे. मात्र, अद्यापही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालेला नसल्याने खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. प्रशासनाकडून पाणीटंचाईच्या काळात टँकरद्वारे पाणीपुरवठा होणार की, पावसाळा सुरू होऊन मुबलक पाणीसाठा झाल्यावर टँकर धावणार?
- गोकूळ कांबळे, ग्रामस्थ, कोंड्ये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com