

42867
हिंदू संस्कृतीसह परंपरा जपा
अभय जगताप : नांदगाव येथे विशाल हिंदू संमेलन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. ११ : हिंदू धर्माला अनेक वर्षांची परंपरा आणि संस्कृती लाभलेली आहे. मात्र, आपल्यातील काही लोकांना सोबत घेऊन आपली संस्कृती संपविण्याचा प्रयत्न विघातक शक्ती करत आहेत. लव्ह जिहादच्या माध्यमातून धर्मांतराचे प्रयत्न वाढत आहेत. सरकारच्या धोरणानुसार ‘हम दो.. हमारे दो..’ जसे हिंदूंना लागू आहे, त्याप्रमाणे अन्य धर्मियांनाही हा कायदा लागू करण्यासाठी लढा उभारला पाहिजे. हिंदू संस्कृती आणि परंपरा राखण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे, असे आवाहन शिवशंभू विचारमंच कोकण प्रांत संयोजक अभय जगताप यांनी केले.
सकल हिंदू समाजाच्यावतीने नांदगाव येथील वाघाचीवाडी सभागृहात विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सरपंच शशिकांत शेटये यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी सकल हिंदू संमेलन संयोजक भगवान लोके, सहसंयोजक भाई मोरजकर, वक्ते डॉ. मिलिंद कुलकर्णी, सभापती हर्षदा वाळके, बजरंग दलाचे दत्तप्रसाद ठाकुर, कोषाध्यक्ष कमलेश पाटील, व्यवस्थाप्रमुख हेमंत कांडर, सहव्यवस्थाप्रमुख बाबू घाडी, प्रदीप हरमलकर, पंढरीनाथ पारकर, कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर, पंढरी वायंगणकर, बेळणे उपसरपंच पंढरीनाथ चाळके, सुभाष बिडये, राजेंद्र मोरजकर, ऋषिकेश मोरजकर, सुशील इंदप, आयनल माजी सरपंच बाबू फाटक, असलदे उपसरपंच सचिन परब, बुवा संतोष मिराशी, बुवा आत्माराम घाडी, मारुती मोरये, हनुमंत वाळके, अनिल नरे, कृष्णा वायंगणकर, बाळा मोरये, प्रभाकर चिके, राजू खोत, विठोबा कांदळकर, जितेंद्र चिकोडी, निलेश तळेकर, डॉ. समीर मुरवणे, ग्रामपंचायत सदस्य अक्षता खोत, गौरी परब आदी उपस्थित होते.
डॉ. मिलिंद कुलकर्णी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोठे कार्य केले असून त्यामुळे आपण ताठ मानेने जगत आहोत. इतिहास बदलण्याचे प्रकार सुरू आहेत. हिंदूंची ताकद कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. हिंदूंचा इतिहास पराभवाचा आहे, असे ब्रिटिशांनी सांगितले; मात्र आपले स्वत्व जागे झाले पाहिजे. संतांनी लिहिलेले अभंग आणि श्लोक मार्गदर्शन करीत आहेत. चुकीचे सांगणाऱ्यांच्या फंदात पडू नका. आपसात भांडू नका. सावरकरांनी सहभोजन, सहशिक्षण आणि सहपूजन यांचे महत्त्व सांगितले आहे. भक्तीमार्ग, कर्मयोग, राजयोग आणि ज्ञानयोग हे चार योग लक्षात ठेवून हिंदू संस्कृती आणि एकजूट टिकवण्यासाठी काम केले पाहिजे.
प्रास्ताविकात संयोजक भगवान लोके म्हणाले, हिंदू संस्कृती, परंपरा आणि संस्कारांचे जतन करणे ही आजच्या काळाची गरज आहे. हिंदुत्व ही केवळ धर्माची नव्हे तर जीवनपद्धती आणि राष्ट्रभक्तीची भावना आहे. समाजामध्ये एकता, बंधुभाव आणि सामाजिक समरसता निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. युवकांनी धर्म, संस्कृती आणि इतिहासाचे ज्ञान घेऊन पुढे यावे. धर्मांतर, व्यसनाधीनता आणि सामाजिक विघटनाविरोधात जनजागृती होणे गरजेचे आहे. नांदगाव दशक्रोशीमध्ये विशाल हिंदू संमेलनाच्या निमित्ताने निर्माण झालेली एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
---
समाजामध्ये अभिमान जागवण्याची गरज
श्री. जगताप म्हणाले, ‘‘ब्रिटिशांनी आपल्या समाजाचा बुद्धिभेद केला. जवळपास १५० वर्षांच्या ब्रिटिश राजवटीमुळे आपण हिंदू अस्मितेपासून दूर गेलो. ८०० वर्षे मुस्लिम सत्ताधीश भारतात राहिले, मात्र त्यापेक्षा ब्रिटिशांनी आपल्या विचारांवर अधिक परिणाम केला. आपण हिंदू आहोत, याचाच अनेकांना विसर पडला आहे. हिंदू समाजामध्ये पुन्हा अभिमान जागवण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी हिंदू म्हणून जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो, त्या ठिकाणी समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.