''त्या'' आवाहनाने सोनार अस्वस्थ

''त्या'' आवाहनाने सोनार अस्वस्थ
Published on

swt125.jpg
42986
काका कुडाळकर

‘त्या’ आवाहनाने सोनार अस्वस्थ
काका कुडाळकर : व्यावसायिक अडचणीत येण्याची भीती
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १२ : वर्षभर सोने खरेदी न करण्याच्या थेट पंतप्रधानांच्या आवाहनामुळे सर्वसामान्य सुवर्ण व्यावसायिक देशोधडीला लागतील अशी भिती, अखिल भारतीय समाज हितकारणी सभेचे कोकण विभाग अध्यक्ष काका कुडाळकर यांनी व्यक्त केली आहे. याचा पुनर्विचार व्हावा, अपेक्षाही त्यांची आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच सोन खरेदी करू नये, असे आवाहन देशवासीयांना केले होते. यावर श्री. कुडाळकर यांनी म्हणणे मांडले आहे. ते म्हणाले, सुवर्ण नियंत्रण कायद्यानंतर गेल्या काही वर्षात आलेल्या विविध बंधनामुळे सुवर्ण व्यवसाय हा सर्व सामान्य सोनारांच्या हाती राहील की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तशातच मोदी यांच्या या सल्ल्यामुळे या सोनार व्यवसायाची हालत आणखीच खराब होणार आहे. आज मोठ्या भांडवलदारांच्या कंपन्यांच्या हाती सोनार व्यवसाय जात आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
आज आमच्या छोट्याशा जिल्ह्यात म्हणा किंवा तालुक्याच्या ठिकाणी म्हणा मोठमोठ्या कंपन्या आपले शोरूम उघडत आहेत. त्यामुळे छोट्या छोट्या बाजारपेठामध्ये सुद्धा स्पर्धा वाढलेली आहे. त्यातच सोन्याचा भाव गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक दुरावलेलाच आहे. अशातच अशा घोषणेमुळे छोटा सुवर्ण व्यावसायिक मोठ्या अडचणीत येणार आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी या आवाहनाचा फेरविचार करावा. अगोदरच मध्यमवर्गीय सोनार व्यावसायिक ज्या अडचणीतून जात आहे त्याला सहकार्य करण्याचे धोरण अवलंबवावे. आज सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातीमध्ये भारताचा जगात आठवा क्रमांक लागतो. त्यामुळे लाखो सोनार कारागीर आपली रोजी रोटी कमवत आहेत. अशांवर उद्या उपासमारीची वेळ येणार आहे. मी एक सोनार समाजाचाच आहे. अखिल भारतीय सोनार हितकारणीचा कोकण विभागाचा अध्यक्षही आहे. त्यामुळे या घोषणेचा मोदी यांनी पुनर्विचार करावा, अन्यथा सोनार समाजामध्ये अस्वस्थता निर्माण होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होईल हे निश्चित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com