

- rat१२p८.JPG-
P26O43003
सडे येथे आयोजित कार्यक्रमात पथदिव्यांचे उद्घाटन करताना समाजसेवक नथुराम सोनघरे व मान्यवर.
सडे-मानेवाडीत पथदिव्यांचे लोकार्पण
लोकवर्गणीतून १५ दिवे; सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १२ : तालुक्यातील सडे-मानेवाडी येथे बालवीर प्रगती मंडळ व वीर जिजामाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या प्रसंगी लोकवर्गणीतून ग्रामस्थांनी बसवलेल्या १५ नवीन पथदिव्यांचे लोकार्पण ज्येष्ठ समाजसेवक नथुराम सोनघरे यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाची सुरुवात वाडीतील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते केक कापून करण्यात आली. या वेळी माजी मंडळ अधिकारी सुरेश जाधव, नंदकिशोर माने, प्रकाश माने, चंद्रकांत माने, रमेश पार्टे, सुलोचना सोनघरे, प्रीती सोनघरे आणि ग्रामपंचायत सदस्या वनिता माने यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. आर्या माने हिने संस्कृतमधून मनोगत व्यक्त करून उपस्थितांची वाहवा मिळवली तसेच बालकलाकारांचे नृत्याविष्कार, लेझिम नृत्य आणि दिंडीने कार्यक्रमात रंगत आणली.
या वेळी महिलांचा सुस्वर हरिपाठ, महाप्रसाद आणि दिलीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली भजनाचा कार्यक्रम झाला. तसेच महिला व पुरुषांची संयुक्त संवाद बैठक घेऊन गावातील विकासकामांवर चर्चा करण्यात आली. दिनेश जाधव यांनी आभार मानले तर भारत सोनघरे यांनी सूत्रसंचालन केले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.