ओणी-गोतावडेवाडीचा वीजप्रश्न सुटला

ओणी-गोतावडेवाडीचा वीजप्रश्न सुटला
Published on

rat१२p११.jpg-
26O43006
राजापूर ः ओणी गोतावडेवाडी येथील उद्‍घाटन केलेल्या नव्या डीपीसमवेत आमदार किरण सामंत यांच्यासमवेत ग्रामस्थ, शिवसेना पदाधिकारी.

ओणी- गोतावडेवाडीतील वीजपुरवठ्याला नवे बळ
१६ लाखांचे नवे विद्युत रोहित्र ; कमी दाबाच्या वीजेची समस्या आता दूर
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १२ : ‘ओणी-गोतावडेवाडीतील नागरिकांचा विजेचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. १६ लाख रुपये खर्च करून नवीन डीपीची (विद्युत रोहित्र) उभारणी करून हा प्रश्न मार्गी लावताना मला विशेष आनंद होत आहे,’ असे प्रतिपादन आमदार किरण सामंत यांनी केले.
तालुक्यातील ओणी गोतावडेवाडी येथे आमदार सामंत यांच्या हस्ते नवीन विद्युत डीपीचे लोकार्पण कार्यक्रमावेळी ते बोलत होते. या वेळी आमदार सामंत म्हणाले, नवीन डीपीमुळे घरगुती ग्राहकांसह शेतकरी वर्गालाही मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात उद्भवणारी कमी दाबाची समस्या आता दूर होईल. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि शेतकामात येणारे अडथळे दूर होऊन नागरिकांचे जीवन सुकर होईल. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरूप, तालुकाप्रमुख दीपक नागले, पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, सदस्य उमेश पराडकर, बाबाशेठ भिंगार्डे, एकनाथ मोघे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कुवळेकर, चंद्रकांत जानस्कर, प्रल्हाद नारकर, गणेश लाड, सुनील गुरव, रविकांत मटकर, तसेच तुकाराम गोतावडे, अनंत गोतावडे, शशिकांत गोतावडे, रमेश गोतावडे यांसह महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
अखंडित वीजपुरवठा
भविष्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊनच या सुविधेची उभारणी करण्यात आली आहे. नवीन यंत्रणेमुळे वीजपुरवठा अधिक सक्षम आणि स्थिर होणार आहे, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com