मुंबई-गोवा महामार्गावरील बेकायदेशीर पार्किंगविरोधात मदत ग्रुपचे निवेदन

मुंबई-गोवा महामार्गावरील बेकायदेशीर पार्किंगविरोधात मदत ग्रुपचे निवेदन
Published on

भरणे-खोपीदरम्यान बेकायदेशीर पार्किंग
अपघातांच्या संख्येत वाढ; ‘मदत ग्रुप’चे निवेदन
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १२ ः मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे जाधववाडी ते खोपीफाटा परिसरात वाढलेल्या बेकायदेशीर पार्किंगमुळे अपघातांचा धोका कमालीचा वाढला आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन ठोस कारवाई करावी, अशी मागणी ‘मदत ग्रुप खेड’चे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गांधी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात पोलिस प्रशासन, महसूल विभाग, महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला सविस्तर निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, या परिसरात महामार्गाच्या कडेला अनेक वाहने नियमांचे उल्लंघन करून उभी केली जात आहेत. विशेषतः रात्रीच्यावेळी कोणतीही सुरक्षायंत्रणा, इंडिकेटर किंवा रिफ्लेक्टर न लावता ही वाहने उभी असल्याने मागून येणाऱ्या वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. यामुळे आतापर्यंत या पट्ट्यात सुमारे १० ते १५ अपघात झाले असून, काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
खोपीफाटा ते भरणे जाधववाडीदरम्यान एकही अधिकृत ‘हायवे बसथांबा’ उपलब्ध नाही. परिणामी, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना भररस्त्यात जीव मुठीत धरून बसची प्रतीक्षा करावी लागते. वाहनांच्या वर्दळीमुळे प्रवाशांच्या जीविताला सतत धोका निर्माण होत आहे. त्यामुळे येथे तातडीने सुरक्षित बसथांबा उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
-----
गांधी यांनी सुचवलेल्या उपाययोजना
* बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई व्हावी.
* संपूर्ण परिसरात ‘नो पार्किंग’चे फलक लावा
* रात्रीच्यावेळी वाहतूक पोलिसांची गस्त वाढवा.
* कारवाईसाठी कायमस्वरूपी क्रेन उपलब्ध ठेवावी.
-----
कोट
नागरिकांच्या जीविताशी होणारा हा खेळ थांबवण्यासाठी प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा आंदोलनात्मक पाऊल उचलावे लागेल.
-- प्रसाद गांधी, खेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com