पंचायत राज अभियानांतर्गत परुळेत समितीकडून पाहणी

पंचायत राज अभियानांतर्गत
परुळेत समितीकडून पाहणी
Published on

swt1222.jpg
43085
परुळे ः समितीचे स्वागत करताना माजी सरपंच तथा सदस्य प्रदीप प्रभू.

परुळेत मूल्यमापण समितीकडून पाहणी
म्हापण, ता. १२ ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज समितीने तालुकास्तरीय मूल्यमापन करण्यासाठी परुळे बाजार ग्रामपंचायतीला भेट देत परीक्षण केले. या समितीमध्ये गटविकास अधिकारी (पंचायत समिती, भोर) चंद्रकांत विपट, विस्तार अधिकारी विलास कोळी, प्रदीप ढवळे, सागर कुडले यांचा समावेश होता. यावेळी कृषी अधिकारी सावंत तसेच श्रीमती कोरगावकर ,ग्रामपंचायत अधिकारी संतोष पिंगुळकर उपस्थित होते .माजी सरपंच प्रदीप प्रभू यांनी समितीचे स्वागत केले. यावेळी आरोग्य विभाग कर्मचारी, अंगणवाडी सेविका, बचतगट सीआरपी आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे यांनी समितीला अभियान अंतर्गत माहिती दिली. समितीने शाळा, अंगणवाडी, व्यायाम शाळा, स्मशानभूमी, वॉटर एटीएम युनिट, सांडपाणी प्रक्रिया युनिट आदी ठिकाणी भेट देत पाहणी केली व समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com