

देवघर मंडळातर्फे शनिवारपासून क्रिकेट स्पर्धा
खेड : तालुक्यातील देवघर येथे ग्रामस्थांच्या वतीने १६ व १७ मे रोजी देवघर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतील विजयी संघाला ७ हजार ७७७ रुपये आणि उपविजयी संघाला ५ हजार ५५५ रुपये आणि व चषक देवून गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक मालिकावीर यांनाही गौरवण्यात येणार आहे. नंदकुमार महाडिक यांच्या सौजन्याने सर्व सामन्यातील सामनावीरास चषक देवून सन्मानित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा खेम पद्मावती मंदिर येथे होणार आहे. यशस्वितेसाठी विपुल मोरे, राजकुमार मोरे, कुणाल मोरे, राम मोरे, मिनेश मोरे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.
दिव्यांग खेळाडूंसाठी खेडमध्ये कोकण चषक
खेड, ता. १३ : भाजपचे गटनेते रहीम सहीबोले व भेकरे बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सचे अनिल भेकरे पुरस्कृत दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने १७ मे रोजी नगरपालिकेच्या पाठीमागील मैदानात दिव्यांग चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात येणार आहे. श्री संतसेना नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष महादेव चव्हाण व मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप तांबे यांच्या मार्फत स्पर्धेत सहभागी होणाऱ्या जिल्हा संघातील खेळाडूंना ड्रेस व कोकणरत्न नागरी सहकारी पतसंस्था अध्यक्ष उमेश नक्षे यांच्या मार्फत सहभागी खेळाडूंना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.