रत्नागिरीत रक्तदान शिबिर उत्साहात

रत्नागिरीत रक्तदान शिबिर उत्साहात
Published on

- rat१३p१५.jpg-
P26O43215
रत्नागिरी ः आर्ट ऑफ लिव्हिंगच्या रक्तदान शिबिरात सहभागी साधक.

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : जागतिक शांतता दूत आणि ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ फाउंडेशनचे संस्थापक परमपूज्य श्री श्री रविशंकर जी यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरीत भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. ‘सेवा हीच खरी गुरुदक्षिणा’ हा विचार मानणाऱ्या संस्थेच्या ४५ व्या वर्धापनदिनानिमित्त हा विधायक उपक्रम राबवण्यात आला.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) ब्लड बँकेत हे शिबिर पार पडले. या उपक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे जयगड येथील चौगुले डॉकयार्डमधील २५ कर्मचाऱ्यांनी विशेषत्वाने उपस्थित राहून रक्तदान केले. केवळ शहरच नव्हे, तर ग्रामीण भागातील नागरिकांनीही या कार्यात हिरिरीने सहभाग नोंदवला. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वरिष्ठ प्रशिक्षिका ॲड. जया उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे नियोजन करण्यात आले होते. त्यांच्यासोबत विनिता गोखले आणि भुवना महागावकर या प्रशिक्षिकांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश भुर्के, संजीवनी मोरे, वैभव भुर्के, सीमा पटवर्धन, प्रमोद खेडेकर, वैभव पालकर आणि सचिन पवार यांनी मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com