पाट तलाव जागतिक दर्जाचा बनवू

पाट तलाव जागतिक दर्जाचा बनवू
Published on

swt1315.jpg
43228
पाट ः तलाव सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व ग्रामस्थ.

पाट तलाव सुशोभीकरणासाठी पाच कोटी
आमदार नीलेश राणे ः कामाचा भूमिपूजन सोहळा
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. १३ ः पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाणारे आणि गेली अनेक वर्षे विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या निसर्गरम्य पाट तलावाच्या सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून, आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते या कामाचे आज दिमाखात भूमिपूजन करण्यात आले. २०२५-२६ या आर्थिक वर्षात हे काम पूर्ण करण्याची उद्दिष्ट असून या प्रकल्पासाठी ५ कोटींचा प्रारंभिक निधी मंजूर केला आहे, अशी ग्वाही यावेळी आमदार राणे यांनी दिली.
या कामांबाबत बोलताना आमदार राणे म्हणाले, ‘‘पाट तलवाचे काम का रखडले, हे आता महत्त्वाचे नाही. भूतकाळात काय झाले, त्यापेक्षा भविष्यकाळात हा प्रकल्प पूर्ण करणे, हे आमचे लक्ष आहे. पाच कोटी हा केवळ सुरुवातीचा निधी आहे. या प्रकल्पाला आवश्यकतेनुसार आणखी वाढीव निधी उपलब्ध करून दिला जाईल.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘पाट गावात हे निसर्गरम्य असे तलाव असून येथून अनेक पर्यटक भोगवे, तारकर्ली, चिपी विमानतळ येथे ये -जा करत असल्याने पर्यटन दृष्ट्या या तलावाचा विकास होणे आवश्यक आहे. त्यामुळे स्थानिकांना भविष्यात रोजगारांची संधी उपलब्ध होऊ शकेल. केवळ तलावाचा नव्हे तर संपूर्ण परिसराचा विकास करण्याच्या उद्देशाने स्थानिक प्रशासनाने काम करावे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या काही विकासकामांच्या याद्या असतील, त्या त्वरित माझ्याकडे सुपूर्द कराव्यात. ती सर्व कामे मार्गी लागून जनतेला दिलासा दिला जाईल.’’
पाट तलावाच्या या सुशोभीकरणामुळे परिसरातील पर्यटनाला चालना मिळून स्थानिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com