खेड- खेडमधील टंचाईग्रस्तांसाठी केवळ एकच टॅंकर

खेड- खेडमधील टंचाईग्रस्तांसाठी केवळ एकच टॅंकर
Published on

43267


खेडमधील ११ गावांची तहान भागवतोय एकच टँकर
ग्रामस्थांच्या घशाला कोरड ः सभापती, अधिकारी नाचवताहेत कागदी घोडे
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १३ : तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता हळूहळू वाढत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे उपलब्ध पाणीसाठ्यात घट होत असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. तालुक्यातील ११ गावातील २१ वाड्यांमध्ये १४१६ ग्रामस्थांच्या घशाला सद्यस्थितीत कोरड पडली आहे. दिवसागणिक टंचाईग्रस्त गाववाड्यांची संख्या वाढत असताना येथील पंचायत समितीकडे एकच टँकर उपलब्ध आहे. एका टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा करताना दमछाक होत आहे.
तालुक्यात उन्हाने कहर केला असून ग्रामस्थ अक्षरशः हवालदिल झाले आहे. त्यातच वाढत्या उष्ट्यामुळे नद्या, नाले, विहिरी कोरड्या पडून ग्रामस्थांची दाहिदिशा सुरू आहे. यामुळे एकामागोमाग एक टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल होत आहेत. तहानलेल्या गाववाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची पुरेपूर व्यवस्था येथील पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने ठेवली असली तरी तहानलेल्या गाव-वाड्यांची मदार एकाच टँकरवर अवलंबून आहे. टंचाईग्रस्त वाड्यांमध्ये धनगरवाड्यांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे या गाव-वाड्यांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करताना प्रशासनाच्या नाकी नऊ येत आहेत.

चौकट
केवळ सूचना, कार्यवाही शून्य
पाण्यावाचून ग्रामस्थांचे हाल होणार नाही, याकडे लक्ष देण्याच्या सूचना पंचायत समिती सभापती डॉ. आफिया पालेकर, उपसभापती सुनील मोरे, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांनी दिल्या आहेत. मात्र त्यावर कोणती कार्यवाही झाली याबाबत लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी पाठपुरावा केलेला दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com