भारत विकास परिषद दिव्यांग केंद्रातर्फे मिळणार मोफत पाय

भारत विकास परिषद दिव्यांग केंद्रातर्फे मिळणार मोफत पाय
Published on

दिव्यांगांना मिळणार मोफत कृत्रिम पाय
भारत विकास परिषद ः २४ ला रत्नागिरीत शिबिर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ : भारत विकास परिषद दिव्यांग केंद्र (पुणे) आणि स्कॉन प्रो. फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय देण्यात येणार आहेत. याकरिता रत्नागिरीत २४ मे रोजी मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत १०० दिव्यांगांनी नोंदणी केली आहे. अजूनही रत्नागिरी व नजीकच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच गोव्यातील दिव्यांगांनी नोंदणी केली नसल्यास त्यांनी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन भारत विकास परिषद दिव्यांग केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
२४ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत साळवी स्टॉप येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात मोजमाप शिबिर होईल. याद्वारे गरजू दिव्यांगांना उच्च दर्जाचे आधुनिक ‘मॉड्यूलर’ कृत्रिम पाय मोफत दिले जाणार आहेत. यापूर्वी अशी शिबिरे चिपळूण, मार्गताम्हाणे येथे आयोजित केली होती. भारत विकास परिषद दिव्यांग केंद्राचे विश्वस्त विनय खटावकर, शिबिर समन्वयक ॲड. दीपक पटवर्धन यांनी आवाहन केले आहे की, संबंधितांनी लगेचच नोंदणी करावी. बाजारात या आधुनिक कृत्रिम पायांची किंमत ५० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, मात्र स्कॉन प्रो. फाउंडेशनच्या सामाजिक निधीतून हे पाय पूर्णपणे मोफत दिले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com