साकव उभारणीसाठी ३० लाखांचा निधी

साकव उभारणीसाठी ३० लाखांचा निधी
Published on

साकव उभारणीसाठी
३० लाखांचा निधी
खेड, ता. १५ : तालुक्यातील ऐनवली- देऊळवाडी पऱ्यावर मांडावे येथे साकव उभारणीसाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रयत्नाने ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. उद्योजिका श्रेया कदम यांच्या हस्ते साकव बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. मांडावे या साकवा अभावी ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. ये-जा करण्यासाठी मार्गच नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. याबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे साकव उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्थांनी साकडे घातले होते. त्यानुसार मंत्री कदम यांनी ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या साकव उभारणीनंतर परिसरातील ग्रामस्थांची वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित व सुलभ होण्यास मदत होणार आहे. गावच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी हमी देत श्रेया कदम यांनी ग्रामस्थांशीही संवाद साधला. याप्रसंगी पंचायत समिती सभापती डॉ. आफिया पालेकर, जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, माजी सभापती सुप्रिया पवार, पंचायत समिती सदस्य महेंद्र भोसले, दर्शना मोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


खोपी- रामजीवाडीतील
ग्रामस्थ टँकरच्या प्रतीक्षेत
खेड, ता. १५ : तालुक्यातील खोपी- रामजीवाडी येथील उपलब्ध पाण्याचे जलस्त्रोत आटल्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी दाहीदिशा सुरू अशी स्थिती झाली आहे. उशाला पिंपळवाडी धरण असून देखील धरणाच्या पाण्याचा काहीच उपयोग होत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंतीच करावी - लागत आहे. आधीच रणरणत्या उन्हामुळे ग्रामस्थ हवालदिल झालेले असतानाच वाढत्या पाणीटंचाईच्या समस्येने ग्रामस्थांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. सद्यस्थितीत तालुक्यात १० गावातील १७ वाड्यांमध्ये पाण्याचा टॅकर धावत आहे. विशेषतः धनगर वाड्यांनाच पाणीटंचाईची सर्वाधिक झळ बसत आहे. खोपी-रामजीवाडी येथेही पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य निर्माण झाले असून ग्रामस्थ पाण्यासाठी अक्षरशः हंबरडाच फोडत आहेत. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी अर्ज दाखल करूनही ग्रामस्थ टँकरच्या प्रतीक्षेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com