

43612
जनगणनेच्या पूर्वतयारीसाठी
‘ड्रोन’द्वारे गावाची पाहणी
वारगांव ग्रामपंचायतीचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १५ : वारगांव येथील कार्यतत्पर सरपंच नारायण शेटये यांच्या कल्पकतेतून आणि मार्गदर्शनाखाली आगामी ‘जनगणना २०२७’ अंतर्गत होणारी घरगणना व अन्य अनुषंगिकबाबी अधिक सोप्या, अचूक आणि पारदर्शक व्हाव्यात, या उद्देशाने वारगांव गावामध्ये ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने चित्रीकरण करण्यात आले. काल (ता.१४) ग्रामपंचायत वारगांव येथे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
जनगणनेसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेत घरांची मोजणी आणि सीमा निश्चिती करताना कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ड्रोनधारक शुभम देसाई यांनी आपल्या कौशल्याने संपूर्ण वारगांव गावाची सीमा, बागा, इमारती, घरे आणि इतर महत्त्वाच्या भौगोलिक बाबींचा व्हिडिओ टिपला. या ‘डिजिटल मॅपिंग’मुळे भविष्यात शासकीय कामात आणि गावच्या नियोजनात मोठी मदत होणार आहे. या महत्त्वपूर्ण मोहिमेवेळी सरपंच नारायण शेटये, लिपिक विलास तळेकर, प्रगणक विश्वनाथ चव्हाण, समिधा शेटये, तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते. आगामी जनगणना ही पूर्णपणे अचूक असावी आणि गावच्या विकासकामांसाठी आपल्याकडे अद्ययावत माहिती असावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे सरपंच नारायण शेटये यांनी यावेळी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून विकासाकडे वाटचाल करणाऱ्या वारगांव ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.