

कृषी दुकानांमधून भात बियाणी उपलब्ध
साखरपा ः पावसाळा ऐन तोंडावर आला असताना ठीकठिकाणी कृषी सेवा दुकानांमधील विविध भात बियाणी विक्रीसाठी आली आहेत. शेतकऱ्यांनी अद्याप ह्या बियाण्यांची खरेदी सुरू केली नसली तरी सदर बियाण्यांविषयी चौकशी सुरू केली आहे. कोकणात सर्वसाधारणपणे २५ मे च्या दरम्यान रोहिणी नक्षत्राला प्रारंभ होतो. हे नक्षत्र सुरू झाल्यावर पाच सहा दिवसात म्हणजेच महिना अखेर पर्यंत शेतकरी पेरणीला प्रारंभ करतात. त्यासाठी आवश्यक ती विविध जातीची हळवी महान बियाणी सध्या सर्वत्र कृषी दुकानदारांनी मोठ्या प्रमाणांवर खरेदी करून त्याचा साठा करून ठेवला आहे. ठिकठिकाणी दुकानांमधून रॅकमध्ये लावलेली बियाण्यांची पॅकेट्स दिसत आहेत.
विधवा, घटस्फोटीतांच्या सर्वेक्षणाची मागणी
साखरपा ः जिल्ह्यातील विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या महिलांचे सर्वेक्षण व्हावे आणि त्यांच्या रोजगारासाठी संधी उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी चक्रभेदी सोशल फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे. त्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. जिल्ह्यात विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या महिला मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मोठा आहे. तो सोडवायचा असेल तर अशा महिलांची निश्चित संख्या कळणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा महिलांचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. हे सर्वेक्षण तातडीने व्हावे अशी मागणे चक्रभेदी सोशल फाउंडेशन ह्या संथेच्या वैदेही सावंत यांनी केली आहे. त्यासाठी एक निवेदन त्यांनी रत्नागिरी, देवरूख येथील नगराध्यक्षांना दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.