

दोन टेंपोच्या धडकेत एक गंभीर
संगमेश्वर, ता. १५ ः मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे येथील बावनदीपुलाजवळ दोन मालवाहतूक गाड्यांमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका चालकाला गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात गुरुवारी (ता. १४) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. आशिष प्रदीप खरसे (वय २७, रा. गिर्ये, ता. देवगड) हा टेंपो घेऊन मुंबईच्या दिशेने जात होता. बावनदी पुलाजवळ पुलाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील वाहतूक एकेरी सुरू होती. त्यावेळी समोरून येणाऱ्या गाडीला खरसे यांच्या गाडीने उजव्या बाजूने धडक दिली. यामध्ये समोरून येणाऱ्या गाडीचा चालक चंद्रशेखर तारासिंग जाधव (वय ४०) हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच त्यांच्या सोबत असलेले राज जाधव यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल संदेश सीताराम जाधव यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी चालक आशिष खरसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.