शिक्षक समायोजनावर तोडगा काढा

शिक्षक समायोजनावर तोडगा काढा
Published on

46091

शिक्षक समायोजनावर तोडगा काढा

नितीन राऊळ ः शिक्षण विभागाच्या सभेत सभापतींचे लक्ष वेधले

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २३ ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची सभा शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषद शाळांमधील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या सभेत इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी पदवीधर शिक्षकांच्या समायोजनाच्या मुद्याकडे लक्ष वेधले. या समायोजन प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील सुमारे ८० ते ९० टक्के वर्ग बंद होण्याची भीती निर्माण झाली असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून यावर सकारात्मक तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सभागृहात नमूद केले.
जिल्हा परिषद शाळांमध्ये माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या महिला मदतनीस यांना दरमहा केवळ २,५०० रुपये मानधन दिले जाते. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हे मानधन अपुरे असल्याने त्यात वाढ करण्यात यावी, अशी मागणीही श्री. राऊळ यांनी केली. विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी मिळणारे अनुदानही अपुरे असल्याने त्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय शाळांना गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सींकडून रोख रक्कम स्वीकारण्यास नकार देऊन धनादेशाद्वारेच पैसे स्वीकारले जात असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. अनेक शाळांच्या खात्यात वेळेवर निधी उपलब्ध नसल्याने गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण होत असल्याचे सांगत संबंधित एजन्सींच्या कार्यपद्धतीची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
---
सभापतींकडून तातडीने दखल
यावर शिक्षण सभापती श्री. राऊळ यांनी शिक्षक समायोजन, मदतनीस मानधन, भोजन अनुदान तसेच गॅस पुरवठ्याशी संबंधित समस्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत लवकरच योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. सभेत उपस्थित सदस्यांनीही विविध शैक्षणिक प्रश्नांवर आपली मते मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com