कोळोशी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव

कोळोशी हायस्कूलमध्ये
विद्यार्थ्यांचा गुणगौरव
Published on

46095

कोळोशी हायस्कूलमध्ये
विद्यार्थ्यांचा गुणगौरव

सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २३ ः शिक्षण प्रसारक मंडळ कोळोशी हडपीड मुंबई संचलित माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी हडपीड येथे दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दात्यांच्या मदतीतून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे कार्य उपाध्यक्ष पांडुरंग कदम, खजिनदार सदानंद लाड, कार्यकारिणी सदस्य संजय नाईक, शाळा समिती अध्यक्ष संतोष चव्हाण, सर्व सदस्य पालक, मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. श्री. कदम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे औचित्य साधत शाळा समिती सदस्य रमेश राणे यांनी आपले नातेवाईक, माजी विद्यार्थ्यांकडून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी जमा केलेल्या निधीतून प्रशालेतील १३ गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात आले. हडपड गावचे ग्रामस्थ सुबोध राणे यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी दोन कॅरम बोर्ड भेट म्हणून दिले. किरण पाताडे यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब लवटे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com