सावंतवाडी पंचायत समितीतर्फे बांदा येथे १ जुलैला ‘कृषिदिन’

सावंतवाडी पंचायत समितीतर्फे
बांदा येथे १ जुलैला ‘कृषिदिन’
Published on

सावंतवाडी पंचायत समितीतर्फे
बांद्यात एक जुलैला ‘कृषिदिन’

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ ः महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री (कै.) वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (ता. १) बांदा येथे भव्य ‘कृषिदिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचायत समिती सावंतवाडी, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व ग्रामपंचायत बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सकाळी ९ वाजता खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये होणार आहे.
​या कार्यक्रमाचे उद्‍घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडी पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव असणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषद सदस्य शिवानी नाईक, संदीप गावडे, शोभा गावडे, विक्रांत सावंत, मायकल डिसोजा, नितीन राऊळ, अपर्णा सातोसकर, सुदन कवठणकर आदींसह पंचायत समिती सदस्य अवनी राऊळ, प्रशांत सुकी, जितेंद्र गावकर, महेश धुरी, नेहा कांबळी, प्रथमेश सावंत, प्रणाली तिळवे, उत्कर्षा गावकर, धनश्री मराठे, उदय परिपत्ये, प्रियांका देसाई, मायकल डिसोजा, प्राजक्ता केळुसकर, सदाशिव राणे, शरद धाऊसकर, ऋतिका नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच रत्नाकर आगलावे, सावंतवाडी पंचायत समिती कृषी अधिकारी शारदा नाडेकर, तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ गोरे, गटविकास अधिकारी नीलेश जाधव हे कार्यरत आहेत. या कृषिदिन कार्यक्रमाला बांदा आणि सावंतवाडी परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com