‘ओम गणेश बालसभे’मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा लौकिक

‘ओम गणेश बालसभे’मुळे
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा लौकिक
Published on

46161

‘ओम गणेश बालसभे’मुळे
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा लौकिक

नितीन राऊळ ः अभिनंदनाचा ठराव घेणार

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २३ ः ‘ओम गणेश बालसभे’मुळे पाडलोसची ‘बालस्नेही पंचायत’ म्हणून जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे. या बालसभेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक झाला आहे. त्यामुळे या बालस्नेही पंचायतीच्या अभिनंदनाचा ठराव घेणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य, इन्सुली तथा सिंधुदुर्ग शिक्षण समिती सदस्य नितीन राऊळ यांनी सांगितले.
पाडलोसची बालस्नेही पंचायत म्हणून प्रथम क्रमांकाने निवड झाल्याने श्री. राऊळ यांनी भेट देत उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी सरपंच सलोनी पेडणेकर, स्वराज सेवा संघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष प्रवीण पंडित, निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, उद्योजक सागर राणे, निवृत्त शिक्षक जगन्नाथ पंडित, पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, मुख्याध्यापक विजय गावडे, शिक्षक अनिल वरक, ग्रामस्थ दिलीप गावडे, पालक मयुरी कुबल आदी उपस्थित होते.
श्री. राऊळ यांनी विद्यार्थ्यांचा पुस्तके, वह्या तसेच अन्य शैक्षणिक साहित्य देऊन गौरव केला. मुख्याध्यापक विजय गावडे यांनी शाळा दुरुस्ती प्रस्तावाकडे सदस्यांचे लक्ष वेधले. प्रास्ताविक शिक्षक अनिल वरक यांनी केले. सरपंच सलोनी पेडणेकर यांनी आभार मानले.
--------------
अभिनंदनाचा ठराव घेणार
ओम गणेश बालसभा ही विद्यार्थ्यांना मिळालेले एक व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिक वाव देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार. ‘विषय सिंधुदुर्गचा, कौशल्य विद्यार्थ्यांचे’ या उपक्रमाखाली चित्रकला स्पर्धा घेणार आहे. तसेच या बालस्नेही पंचायतीच्या अभिनंदनाचा ठराव घेणार असल्याचे श्री. राऊळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com