खेर्डीत व्यापाऱ्यांनीचे काढले नाले !

खेर्डीत व्यापाऱ्यांनीचे काढले नाले !
Published on

rat२४p१२.JPG ः
26O46303
खेर्डी - येथील व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या दुकानासमोरील नाले मोकळे करण्याची सूचना करताना विनोद भुरण.
---
खेर्डी बाजारपेठेच्या सुरक्षेसाठी नाले मोकळे
व्यापाऱ्यांचा पुढाकार ; पाण्याच्या निचऱ्यासाठी केला उपाय
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ : चिपळूण शहराचे उपनगर असलेल्या खेर्डी बाजारपेठेत पावसाचे पाणी साचून व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पंचायत समिती सदस्य विनोद भुरण यांनी आज बाजारपेठेची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या दुकानांसमोर पाण्याचा निचरा होण्यासाठी तात्पुरते नाले (गटार) काढण्याची सूचना त्यांनी केली. व्यापाऱ्यांनीही या सूचनेचे स्वागत करत तातडीने दुकानांसमोर चर मारण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
मे महिन्यात झालेल्या अवकाळी मुसळधार पावासामुळे खेर्डी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. रात्रीच्या वेळी अचानक पाणी भरल्याने व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली होती. त्यानंतर जून महिन्याचे सुरुवातीचे २० दिवस कोरडे गेले असले, तरी मंगळवारपासून तालुक्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. मंगळवारी रात्री खेर्डी परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पार्श्वभूमीवर, बुधवारी सकाळी व्यापारी दुकाने उघडत असतानाच पंचायत समिती सदस्य विनोद भुरण हे आपल्या सहकाऱ्यांसह बाजारपेठेत पोहोचले.
कोकण रेल्वे पुलापासून ते थेट खेर्डी ग्रामपंचायतीपर्यंतच्या सर्व दुकानदारांची त्यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. ‘दुकानांसमोर पाणी साचल्यास ग्राहक आणि व्यापाऱ्यांना मोठा त्रास होईल यावर उपाय म्हणून दुकानासमोर नाला काढून पाण्याचा निचरा करणे गरजेचे आहे,’ अशी सूचना भुरण यांनी केली. व्यापाऱ्यांनीही याला सकारात्मक प्रतिसाद देत कामाला सुरुवात केली. बाजारपेठेतील काही दुकानांसमोर नाले असूनही त्यावर फरशा टाकून अतिक्रमण करण्यात आले होते. भुरण यांनी अशा व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन नाले मोकळे करण्यास भाग पाडले तर काही व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घेतले. पावसाचे चार महिने प्रशासनाला व स्थानिक लोकप्रतिनिधींना सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी या वेळी केली.
----
कोट
खेर्डी बाजारपेठेत पावसाचे पाणी साचून व्यापाऱ्यांना होणाऱ्या त्रासावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. तात्पुरती सोय म्हणून प्रथम पाण्याचा निचरा होणे गरजेचे होते. त्या दृष्टीने व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन रस्त्याच्या कडेला नाला काढण्याची सूचना केली. खेर्डीतील व्यापारी आणि स्थानिक नागरिक अत्यंत समजूतदार आहेत. त्यांनी सूचनेचे स्वागत करून प्रत्यक्ष कृती केल्यामुळे पावसाच्या पाण्याचा त्रास नक्कीच कमी होणार आहे.
- विनोद भुरण, पंचायत समिती सदस्य, खेर्डी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com