

एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा
२८ ला रत्नागिरीत स्नेहमेळावा
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा, रत्नागिरी आगार व टीआरपी येथून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा तालुकास्तरीय स्नेहमेळावा येत्या २८ जूनला सकाळी १० वाजात दत्तमंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये जूनमध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत अशा सुमारे ४४ सभासदांचे वाढदिवस साजरे करण्यात येणार आहेत. निवृत्त झालेल्या ज्या कर्मचाऱ्यांनी इतर क्षेत्रांमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा सभासदांचेही सत्कार करण्यात येणार आहेत. येथे भोजनव्यवस्था केली आहे. रत्नागिरी आगारातील सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या सभासदांनी मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
४६३२६
मोरया युवा प्रतिष्ठानतर्फे
शालोपयोगी वस्तूंचे वितरण
रत्नागिरी : धामणसे येथील मोरेवाडीतील मोरया युवा प्रतिष्ठानने गावातील सांबरेवाडी, जोशीवाडी, बौद्धवाडी, चौकेवाडी, रेवाळेवाडी तसेच केंद्रशाळा धामणसे क्र. १ या सर्व शाळा व अंगणवाडीत विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप केले. पर्यावरण जागृतीसाठी प्रत्येक शाळेला झाडे देऊन वृक्षारोपण केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचे महत्त्व अधिक जागरूकपणे समजले आहे. सात-आठ वर्षांपासून, मोरया युवा प्रतिष्ठान सामाजिक आणि शैक्षणिक कामांमध्ये सातत्याने योगदान देत गावाच्या प्रगतीला हातभार लावत आहे. या उपक्रमात मोरया युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य, तसेच वाडीतील व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. मोरया युवा प्रतिष्ठानचे सचिव जितेश मोरे यांनी मदत करणाऱ्यांचे आभार मानले.
४६३२७
मिळंद-सावडावला एकल महिलांचा सन्मान
पावस ः आंतरराष्ट्रीय एकल महिला दिन-राजापूर तालुक्यातील मिळंद-सावडाव ग्रामपंचायतीत एकल महिलांचा सन्मान, स्वयंरोजगारावर मार्गदर्शन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय एकल महिलादिनाचे औचित्य साधून आज ग्रुपग्रामपंचायत मिळंद-सावडाव येथे एकल महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन गावातील एकल महिलांच्या हस्ते करून झाली. ग्रामपंचायतीच्यावतीने उपस्थित सर्व एकल महिलांना सन्मानित करण्यात आले. या वेळी एकल महिलांच्या रोजगार, स्वयंरोजगार आणि उपजीविकेच्या संधींबाबत सविस्तर चर्चा झाली. महिलांना बचतगटाच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक व सामाजिक बळाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. ज्या महिला अद्याप बचतगटात समाविष्ट झालेल्या नाहीत त्यांनी बचतगटात सहभागी व्हावे, यासाठी मतपरिवर्तनशील मार्गदर्शन देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.