

एनओसीप्रकरणी बीडीओवर
कारवाईची राष्ट्रवादीची मागणी
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे धाव
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २५ : एडगाव वायबोंशी येथील पेट्रोल पंप ना हरकत प्रमाणपत्र (एन ओ सी) विवादाविषयी दाखल केलेल्या अपिलावर येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
श्री. चव्हाण यांनी एडगाव वायबोंशी येथे पेट्रोल पंप उभारणीकरिता ग्रामपंचायतीकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती; परंतु ग्रामपंचायतीने प्रमाणपत्र दिलेले नाही. त्यामुळे श्री. चव्हाण यांनी १७ एप्रिलला येथील गटविकास अधिकाऱ्यांकडे प्रमाणपत्राविषयी अपील दाखल केले होते. या अपीलांनंतर आपल्याशी कोणताही पत्रव्यवहार गटविकास अधिकाऱ्यांनी केला नाही किंवा या प्रकरणाची सुनावणी देखील घेतली नाही. गटविकास अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली आहे, त्यामुळे त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी आणि अपील आपल्याकडे वर्ग करून घ्यावे, अशी मागणी श्री. चव्हाण यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
कोट
राजकीय दबावापोटी माझ्या प्रकल्पाला ना हरकत प्रमाणपत्र दिले जात नाही. अधिकाऱ्यांनी दबावाला बळी न पडता प्राप्त अर्जावर कार्यवाही करणे आवश्यक होते. परंतु, गटविकास अधिकाऱ्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही.
- रवींद्र चव्हाण, अर्जदार तथा तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, वैभववाडी.
---------
कोट
एडगाव वायबोंशी ग्रामपंचायतीने विविध कारणांमुळे ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी मुदतीत अपील केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या अपीलावर मुदतीत कार्यवाही करण्याचा प्रश्नच येत नाही.
- प्रिमेश वाघ, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, वैभववाडी.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.