

-rat२५p१८.jpg-
P26O46571
दापोली ः विहिरीत पडून गंभीर जखमी झालेल्या भेकराला दापोली वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने अथक प्रयत्न करून सुरक्षित बाहेर काढले.
-----
खेर्डीत विहिरीत पडलेल्या भेकराला जीवदान
दापोली वनविभागाची तत्परता; पुण्यातील रेस्क्यू सेंटरमध्ये उपचार
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २५ ः विहिरीत पडून गंभीर जखमी झालेल्या भेकराला दापोली वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने सुरक्षित बाहेर काढत जीवदान दिले. दापोली तालुक्यातील खेर्डी-माळवाडी येथील ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे एका वन्यजीवाचा जीव वाचला असून, सध्या या भेकरावर पुणे येथील रेस्क्यू सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
मौजे खेर्डी माळवाडी येथील ग्रामस्थ पांडुरंग केळकर यांच्या विहिरीत २३ जूनला भेकर पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ भ्रमणध्वनीद्वारे याबाबत वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच दापोली वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने घटनास्थळी धाव घेत विहिरीची पाहणी केली असता भेकर विहिरीत पडल्याची खात्री झाली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाच्या पथकाने काळजीपूर्वक रेस्क्यू ऑपरेशन राबवत भेकराला सुरक्षितपणे विहिरीतून बाहेर काढले; मात्र, विहिरीतील खडकावर पडल्याने त्याच्या समोरील उजव्या पायाला गुडघ्यापासून गंभीर दुखापत झाल्याचे आढळून आले. त्याची तातडीने पशुधन विकास अधिकारी डॉ. मुकुंद लोंढे यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली. भेकराच्या पुढील उपचारासाठी विलंब न करता विशेष वाहनाने त्याला पुणे येथील रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवण्यात आले असून, तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हे रेस्क्यू ऑपरेशन वनपाल दापोली रामदास खोत, वनरक्षक खेर्डी विश्वंभर झाडे तसेच वन्यजीवप्रेमी किरण करमरकर यांनी वनक्षेत्रपाल दापोली प्रकाश पाटील यांच्या सहकार्याने पार पाडले.
----
वन्यजीवांची शिकार हा गुन्हा
भेकर हा वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ मधील शेड्यूल अंतर्गत संरक्षित तृणभक्षी वन्यजीव आहे. या वन्यजीवाची शिकार करणे, त्याला पकडणे किंवा बाळगणे हा गंभीर गुन्हा असून, त्यासाठी ३ ते ७ वर्षांपर्यंत कारावास तसेच २५ हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. याशिवाय गुन्ह्यात वापरलेली मालमत्ताही सरकारजमा होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.