लांजा बसस्थानकात वृक्षारोपण

लांजा बसस्थानकात वृक्षारोपण
Published on

- rat१५p५.jpg-
26O51014
लांजा बसस्थानक परिसरात रोपांची लागवड करताना अधिकारी.

लांजा बसस्थानक परिसरात वृक्षारोपण
लांजा ः महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या ७८व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यभर राबवण्यात आलेल्या व्यापक वृक्षारोपण अभियानांतर्गत लांजा एसटी डेपो व बसस्थानक परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. एसटी महामंडळाच्या सर्व विभागीय कार्यालयात, आगारांमध्ये आणि बसस्थानक परिसरात वृक्षारोपण केले. या पार्श्वभूमीवर सकाळी साडेदहा ते साडेअकरा या वेळेत लांजा एसटी डेपो व बसस्थानक येथे विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. वनविभागाकडून रोपे उपलब्ध करून देण्यात आली तर गवाणे सामाजिक वनीकरण विभागाकडून २०० व श्रीकृष्ण हेगिष्टे यांच्या प्रयत्नातून भांबेड वनीकरण विभागाकडून १०० रोपे उपलब्ध झाली. या कार्यक्रमाला लांजा पंचायत समितीच्या सभापती मानसी आंबेकर, वनपाल धुळू कोळेकर, शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, शिवसेना विभागप्रमुख दिनेश पवार, पंचायत समिती सदस्य दीपाली साळवी, वृषाली चव्हाण, रसिका मेस्त्री, शैलेश खामकर, दीपक कदम, प्रवासी संघटनेचे सचिव रवींद्र राणे, सदस्य जितेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.


तळवडे येथे विद्यार्थ्यांचा गौरव
लांजा : तालुक्यातील ज. गं. पेडणेकर माध्यमिक विद्यालय, तळवडे येथे वार्षिक विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. प्रशालेतील विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था (मुंबई) कमिटीचे उपाध्यक्ष ॲड. रमेश कदम यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. राज्य, विभाग, जिल्हा व तालुका पातळीवर क्रीडा, कला आणि विज्ञानस्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून शाळेचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला. तसेच गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. या प्रसंगी दहावीच्या परीक्षेत विद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त लतिका सावंत, कस्तुरी मेस्त्री, दीपराज इंगळे यांसह दहावीतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com