सायकलिंग चॅलेंजमध्ये चिपळूण सायकल क्लबचे यश

सायकलिंग चॅलेंजमध्ये चिपळूण सायकल क्लबचे यश
Published on

‘वारी सायकलिंग’चे दाभोळकर मानकरी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १५ : अखिल भारतीय पंढरपूर वारी समितीच्यावतीने आषाढी एकादशी वारीपूर्वी पंढरपूर येथे सायकलवारीचे नियोजन तसेच सायकलपटूंचे संमेलन उत्साहात झाले. वारीनिमित्त ९० दिवसांच्या सायकलिंग चॅलेंजमध्ये चिपळूण क्लबचे अध्यक्ष प्रशांत दाभोळकर यांनी ९० दिवस सायकलिंग करून ६ हजार ४३१ किलोमीटर सायकलिंग पूर्ण करत सातवा क्रमांक पटकावला. याबद्दल विशेष पदक देऊन त्यांचा सत्कार अखिल भारतीय पंढरपूर वारी समितीने केला.
सायकलिंग चॅलेंजमध्ये किमान ६० दिवस सायकल चालवत एक हजार किलोमीटरचे उद्दिष्ट पूर्ण करणे आवश्यक होते. यात २५००हून अधिक सायकलपटू तसेच १३५ सायकलिंग क्लबनी सहभाग नोंदवला. यात चिपळूण सायकलिंग क्लबचे ३४ सदस्य सहभागी झाले. महिलागटात प्रणाली दाभोळकर यांनी ६९ दिवसांत १,६३२ किलोमीटर सायकलिंग पूर्ण करत महिला गटात ३१वा क्रमांक मिळवला.
सदस्य भोसले यांनीही संपूर्ण चॅलेंजमध्ये ८४ दिवसमध्ये ४ हजार ९८२ किलोमीटर सायकलिंग करून १६वे स्थान पटकावले. आशिष आयरे यांनी ८४ दिवसांमध्ये तीन हजार २७० किलोमीटर, डॉ. सचिन खेडेकर यांनी ६७ दिवसांमध्ये २ हजार ५५० किलोमीटर, अंकुश जंगम यांनी ६३ दिवसांमध्ये एक हजार ८४३ किलोमीटर सायकलिंग करून यश मिळवले.
------
सायकलवारी उत्साहात
शक्ती, भक्ती आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत चिपळूण-पंढरपूर सायकलवारीत ३३ जण सहभागी झाले. चिपळूण ते पंढरपूर असा सुमारे २५० किलोमीटरचा सायकलवारी प्रवास पूर्ण करून ते संमेलनस्थळी पोहोचले. प्रत्येक क्लबला गौरवण्यात आले. अध्यक्ष दाभोळकर यांच्या विनंतीवरून चिपळूण क्लबच्यावतीने हेमंत भोसले यांनी पुरस्कार स्वीकारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com