रुग्ण सेवा साहित्य प्रदान

रुग्ण सेवा साहित्य प्रदान
Published on

- rat५p१.jpg-
26O55375
रत्नागिरी : जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरीतर्फे साठरे बांबर गावासाठी रुग्णोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ.
---
‘जायंट्स’तर्फे रुग्ण सेवा साहित्य भेट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरीतर्फे साठरे बांबर पंचक्रोशीसाठी रुग्णसेवा साहित्य कपिल वस्तू बुद्धविहारच्या संकुलामध्ये प्रदान करण्यात आले. या मदतीमुळे साठरेबांबर पंचक्रोशीच्या दुर्गम भागातील रुग्णांना हे सेवा साहित्य यापुढे तातडीने उपलब्ध होणार आहे.
योजक असोसिएट्सचे श्रीकांत भिडे आणि त्यांची कन्या राधिका भिडे यांनी तिच्या वाढदिवसानिमित्त पन्नास हजारांची देणगी दिली व जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरीच्या माध्यमातून रुग्णसेवा साहित्य प्रदान करण्यात आले. यामध्ये, दोन गादी, उशी, फोल्डिंग कॉट्स, तीन कमोड चेअर्स, दोन व्हीलचेअर्स, तीन वॉकर, दोन फोल्डिंग काठ्या, ट्रॉलीसह स्ट्रेचर, आयव्ही स्टॅण्ड आणि इतर साहित्य देण्यात आले. जायंट्स ग्रुपतर्फे सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम राबवण्यात आला. गतवर्षी राजापूरजवळील साखरीनाटे येथे हा उपक्रम राबवण्यात आला होता.
या कार्यक्रमाला जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष महेश दामले, सचिव पराग गोडबोले, खजिनदार संतोष कदम, साठरे बांबर पंचक्रोशीतील बौद्ध विकास मंडळ ग्रामीण (मुंबई) मंडळाचे अध्यक्ष नथुराम सावंत, उपाध्यक्ष अमोल कांबळे, सचिव संजू सावंत, माजी अध्यक्ष सुनील सहस्रबुद्धे, लक्ष्मीकांत भुते, प्रवीण डोंगरे आणि विनय जोशी, विजय पोकळे, विशेष समिती सदस्य मिलिंद सावंत आणि संजय पाटणकर, फेडरेशन अध्यक्ष गजानन गिड्ये, उपाध्यक्षा माधुरी कांबळे, राहुल सावंत, चंद्रमणी सावंत, करण सावंत, सुनील सावंत, कांचन सावंत, नथुराम सावंत, अनंत सावंत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com