-बसस्थानकाकडे जाणारा मुख्य रस्ता खड्डेमय

-बसस्थानकाकडे जाणारा मुख्य रस्ता खड्डेमय
Published on

- Rat५p१४.jpg -
P26O55390
मंडणगड: मंडणगड बसस्थानक व नगरपंचायत कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे.
---
मंडणगड बसस्थानक रस्ता बनला खड्डेमय
वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त; डागडुजीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ५ ः शहरातील बसस्थानक ते नगरपंचायत कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची यंदाच्या पावसाळ्यात प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले मोठे खड्डे, त्यात साचलेले पाणी आणि अनधिकृत पार्किंगमुळे हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला असून अपघाताची शक्यता वाढली आहे.
बाणकोट-पंढरपूर मार्गाला जोडणारा हा रस्ता तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग आहे. या परिसरात शहराची मुख्य बाजारपेठ, नगरपंचायत कार्यालय, व्यापारी संकुले आणि फळविक्रेते असल्याने दिवसभर येथे नागरिकांची मोठी गर्दी असते. बसस्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार याच रस्त्यावर असल्याने एसटी बस, खासगी वाहने आणि दुचाकींची सतत वाहतूक सुरू असते. रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना, विशेषतः दुचाकीस्वार व ज्येष्ठ नागरिकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या एका बाजूला रिक्षास्टँड आणि दोन्ही बाजूंना होणाऱ्या बेशिस्त वाहन पार्किंगमुळे रस्ता अधिकच अरुंद झाला आहे. हा रस्ता नगरपंचायतीच्या अखत्यारित येत असूनही गेल्या वर्षभरात याची साधी डागडुजीही करण्यात आलेली नाही, असे स्थानिकांचे मत आहे.
----
अवैध पार्किंगवर कारवाई करा
या मार्गावरील खड्डे तातडीने बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी, वाहतुकीचे योग्य नियोजन करावे आणि अवैध पार्किंगवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी मंडणगड येथील नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

muncipal corporation
The protesters have demanded immediate administrative action to remove the encroachment and reopen the road.
Beed
Chhatrapati Sambhajinagar
Marathi News Esakal
www.esakal.com