

rat५p१०.jpg -
26O55382
रत्नागिरी ः झरेवाडी येथील पीएमश्री केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुस्तके देताना मान्यवर.
झरेवाडीतील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः तालुक्यातील झरेवाडी येथील ‘पीएमश्री जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळेतील’ चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची मार्गदर्शक पुस्तके देणगी म्हणून देण्यात आली. ही पुस्तके उपलब्ध करून देणारे दानशूर व्यक्तीमत्त्व ॲड. अवधूत कळंबटे आणि डॉ. नितीन कळंबटे यांचा शाळा व्यवस्थापन तसेच ‘लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयल’च्यावतीने विशेष सन्मान करण्यात आला.
या वेळी लायन्स क्लब ऑफ हातखंबाचे अध्यक्ष गिरीश शितप यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा केली. ‘स्पर्धा परीक्षांसाठी बसणाऱ्या कोणत्याही गरजू विद्यार्थ्याला फी भरण्यास अडचण येत असल्यास, लायन्स क्लबतर्फे त्याला पूर्ण आर्थिक मदत केली जाईल. तसेच भविष्यात शाळेत विद्यार्थ्यांसाठी विशेष स्पर्धा परीक्षा कार्यशाळा आयोजित केली जाईल,’ असे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ओंकार आचरेकर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वसंत कळंबटे, माजी सरपंच व माजी विद्यार्थी संघटना पदाधिकारी चंद्रकांत गोताड, संतोष गोताड, मुख्याध्यापिका संजीवनी यादव, सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी भरघोस देणगी देणाऱ्या दात्यांचे व सहकार्य करणाऱ्या लायन्स क्लबचे शाळेच्यावतीने आभार मानण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.