

55418
नाना गावकर
55414
शंकर गावकर
ओरोस येथे पिता-पुत्रांचा
एकाच मंचावर होणार गौरव
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. ५ : येथील गावचे ज्येष्ठ दशावतार कलावंत आना उर्फ नाना धोंडीराम गावकर आणि त्यांचे सुपुत्र, सध्या दशावतार क्षेत्रात झांज वादक म्हणून कार्यरत असलेले शंकर गावकर या दोन्ही पिता-पुत्रांचा एकाच मंचावर मानाच्या पुरस्काराने गौरव होणार आहे. दशावतार कलेच्या सेवेसाठी आयुष्यभर कार्य करणाऱ्या नाना गावकर यांना कोकण कला जीवन गौरव पुरस्कार तर युवा पिढीत ही कला जपणारे शंकर गावकर यांना कोकण रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
कोकण बुक ऑफ रेकॉर्ड्स, यशश्री फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ''कोकण कला साहित्य गौरव संमेलन २०२६'' या भव्य कार्यक्रमात या दोन्ही पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. हा सोहळा रविवार दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार भवन, ओरोस, येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते पार पडणार आहे. ज्येष्ठ कलावंत आना उर्फ नाना गावकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य दशावतार कलेच्या सेवेसाठी अर्पण केले आहे. विद्यार्थी दशेपासूनच त्यांना या लोककलेची ओढ लागली. सुरुवातीच्या काळात कलाकारांच्या बॅगा उचलण्यापासून त्यांनी आपल्या कलाप्रवासाला सुरुवात केली. अथक मेहनत, जिद्द आणि अभिनयाच्या बळावर त्यांनी रंगभूमीवर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. राजा, ऋषी, पौराणिक तसेच विविध प्रभावी भूमिका त्यांनी अत्यंत समर्थपणे साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. त्यांच्या अभिनयातील सहजता असल्याने ते दशावतार क्षेत्रातील मान्यवर कलाकार म्हणून ओळखले जातात.
त्यांचे सुपुत्र शंकर गावकर यांनीही वडिलांचा कला वारसा समर्थपणे पुढे नेला आहे. दशावतारातील झांज वादक म्हणून त्यांनी आपल्या वादनातून अनेक नाट्यप्रयोगांना प्रभावी साथ दिली आहे. संगीत, ताल आणि शिस्तबद्ध सादरीकरणामुळे त्यांनी अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दशावतार कलेतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना ''कोकण रत्न पुरस्कार'' प्रदान करण्यात येणार आहे. या दुहेरी सन्मानाबद्दल गावातील नागरिक, दशावतारप्रेमी, विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्था तसेच कला क्षेत्रातील मान्यवरांकडून नाना गावकर आणि शंकर गावकर यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.