देवरुख ः महिलांनी ग्रामसभेत सक्रिय सहभाग घ्यावा

देवरुख ः महिलांनी ग्रामसभेत सक्रिय सहभाग घ्यावा
Published on

- rat६p२.jpg-
6O55593
संगमेश्वर- तालुक्यातील कर्ली येथील मेळाव्याला उपस्थित महिला.
-----
ग्रामविकासात महिलांची भूमिका महत्त्वाची
प्रमोद अधटराव ः कर्लीत महिला मेळावा अन् आरोग्य शिबिर
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. ६ ः ‘ग्रामसभेत महिलांचा सहभाग वाढणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. महिलांनी ग्रामसभेत सक्रिय सहभाग घेतल्यास गावाचा विकास अधिक वेगाने होईल. गावातील किंवा शाळेतील कोणतीही समस्या माझ्यापर्यंत थेट पोहोचवा,’ असे जिल्हा परिषद सदस्य प्रमोद श्रीधर अधटराव यांनी सांगितले.
तालुक्यातील कर्ली ग्रामपंचायतीतर्फे ‘सक्षम महिला–सक्षम गाव’ या संकल्पनेअंतर्गत आयोजित महिला मेळावा व मोफत आरोग्य शिबिराच्या उद्‍घाटनावेळी ते बोलत होते. या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी अधटराव यांनी ग्रामसभा केवळ औपचारिक न राहता विकासाचे प्रभावी व्यासपीठ बनाव्यात तसेच शासनाच्या सर्व योजना गावातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यासाठी संबंधित अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनाने जबाबदारीने काम करावे, अशा सूचना दिल्या.
या मेळाव्यात धामापूर प्राथमिक आरोग्यकेंद्र आणि इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा गावातील अनेक महिलांनी लाभ घेतला. आरोग्य तपासणीसह विविध आजारांबाबत जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमावेळी आंबव ग्रामपंचायतीच्या सरपंच माधवी अधटराव, माजी सरपंच प्रदीप रावणंग, माजी उपसरपंच बावा चाळके, समीर चाळके, सुशील चाळके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
समाज परिवर्तनात सक्रिय भूमिका घ्या
या प्रसंगी चैताली शेलार यांनी महिला नेतृत्व विकास, गावाच्या प्रगतीत महिलांचे योगदान आणि बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन कसे साधता येईल, या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. महिलांनी स्वतःमधील क्षमता ओळखून आत्मविश्वासाने पुढे यावे आणि समाज परिवर्तनात सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com