

swt६९.jpg
५५६२५
सावंतवाडी : तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन देताना सुरेश भोगटे व ग्रामस्थ.
बेकायदा सपाटीकरणामुळे घरांना धोका
कारिवडेवासीयांचा आरोप ः दोषींवर तत्काळ कारवाईची प्रशासनाकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ ः कारिवडे-भैरववाडी (भोगटेनगर) येथील डोंगर जमिनीचे बेकायदेशीरपणे सपाटीकरण करून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलल्यामुळे परिसरातील ३५ ते ४० घरांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. यामुळे रहिवाशांच्या विहिरी, घरे आणि कम्पाउंड वॉलचे मोठे नुकसान झाले असून, संबंधित दोषींवर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी आणि बाधित नागरिकांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.
यासंदर्भात तहसीलदार श्रीधर पाटील व पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कारिवडे-भैरववाडी येथील सुमारे २५ एकर जमिनीमध्ये जेसीबी व पोकलेनसारख्या अवजड यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर सपाटीकरण केले आहे. या उत्खननामुळे पावसाचे पाणी व माती वाहत येऊन परिसरातील घरांमध्ये आणि विहिरींमध्ये शिरत आहे. मुसळधार पावसामुळे काहींच्या संरक्षक भिंती पूर्णपणे कोसळल्या असून मोठी वित्तहानी झाली आहे. जमिनीचे उत्खनन व सपाटीकरण करताना आवश्यक शासकीय परवानग्या आणि कायदेशीर बाबींची पूर्तता केली आहे का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बदललेला पाण्याचा प्रवाह पूर्ववत करण्यासाठी संबंधितांना तत्काळ ताकीद द्यावी आणि भविष्यात असा धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी ठाम मागणी केली आहे. निवेदनावर माजी नगरसेवक सुरेश भोगटे, आनंद आरोलकर यांच्यासह स्थानिक रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.