''नारळ लढवणे'' खेळाला अधिकृत मान्यता द्यावी

''नारळ लढवणे'' खेळाला अधिकृत मान्यता द्यावी
Published on

''नारळ लढवणे'' खेळाला
अधिकृत मान्यता द्यावी
रविकिरण तोरसकर ः मुख्यमंत्र्यांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ६ : महाराष्ट्राच्या समृद्ध कोकण किनारपट्टीवर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आणि नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर खेळल्या जाणाऱ्या ‘नारळ लढवणे’ या ऐतिहासिक व पारंपरिक खेळाला राज्य शासनाकडून ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ म्हणून अधिकृत मान्यता मिळण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मालवण नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर यांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना पत्राद्वारे ही आग्रही विनंती केली आहे. भाजप महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अतुल काळसेकर हे देखील यासाठी विशेष पाठपुरावा करत आहेत.
पत्रात म्हटले आहे की, कोकणातील विविध कोळीवाड्यांमध्ये आणि किनारपट्टी भागात गेल्या अनेक शतकांपासून ‘नारळ लढवणे’ हा पारंपरिक खेळ सण-उत्सवासारखा उत्साहात साजरा केला जातो. यामध्ये योग्य नारळाची पारख करणे, अचूक निशाणा साधणे आणि विशिष्ट तंत्राने नारळ लढवणे यांसारख्या साहसी व तांत्रिक बाबींचा समावेश असतो. सध्या या खेळाला युवा वर्गासह पर्यटकांचाही मोठा प्रतिसाद मिळत असून अलीकडच्या काळात महिलांसाठीही नारळ लढवण्याच्या स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित केल्या जात आहेत.
या परंपरेला शासकीय संरक्षण मिळाल्यास पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही लोकसंस्कृती पुढील पिढ्यांपर्यंत सुरक्षित राहील. आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाचा प्रसार झाल्यास देश-विदेशातील पर्यटक कोकणाकडे आकर्षित होतील, ज्यामुळे स्थानिक पर्यटनाला मोठा वाव मिळेल. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन मालवणच्या या ऐतिहासिक ‘नारळ लढवणे’ परंपरेस ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ म्हणून अधिकृत मान्यता द्यावी. राज्य शासनाच्या वार्षिक सांस्कृतिक व पर्यटन कॅलेंडरमध्ये या परंपरेचा समावेश करून त्यास शासकीय प्रोत्साहन देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com