''जिव्हाळा''चे सेवाकार्य प्रेरणादायी

''जिव्हाळा''चे सेवाकार्य प्रेरणादायी
Published on

swt68.jpg
55624
माड्याचीवाडी ः उद्योगपती अनिल पाटोदिया यांचा सत्कार करताना जिव्हाळा सेवाश्रमचे संस्थापक अध्यक्ष सुरेश उर्फ दादा बिर्जे. सोबत सौ. पाटोदिया, मोहन आरोंदेकर. (छायाचित्र ः अजय सावंत)

‘जिव्हाळा’चे सेवाकार्य प्रेरणादायी
अनिल पाटोदिया ः माड्याचीवा़डी आश्रमाला सदिच्छा भेट
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ ः समाजातील वंचित घटकांसाठी निःस्वार्थ भावनेने सुरू असलेले जिव्हाळा सेवाश्रमचे सामाजिक कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. अशा सेवाभावी संस्थांना समाजातील सर्व स्तरांतून सहकार्य मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन बाईक हॉस्पिटॅलिटी लिमिटेडचे संस्थापक तथा देशातील नामवंत उद्योगपती अनिल पाटोदिया यांनी केले.
श्री. पाटोदिया आणि त्यांच्या पत्नी अर्चना पाटोदिया यांनी माड्याचीवाडी येथील श्री सुरेश बिर्जे संचलित जिव्हाळा सेवाश्रमाला सदिच्छा भेट देत संस्थेच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. यावेळी त्यांनी सेवाश्रमातील विविध उपक्रमांची माहिती घेत लाभार्थ्यांशी संवाद साधला.
संस्थाध्यक्ष सुरेश उर्फ दादा बिर्जे म्हणाले, ‘‘श्री. पाटोदिया यांनी व्यवसायाच्या यशाबरोबरच सामाजिक बांधिलकी आणि आध्यात्मिक मूल्यांची जपणूक केली, हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्य विविध उद्योग-व्यवसायांमध्ये कार्यरत असून अनेक उद्योग जागतिक स्तरावर यशस्वीपणे विस्तारले आहेत.’’
जिव्हाळा सेवाश्रमात सुरू असलेल्या निराधार, ज्येष्ठ नागरिक आणि गरजूंसाठीच्या सेवाकार्याची माहिती घेतल्यानंतर पाटोदिया यांनी संस्थेच्या कार्याचे अभिनंदन केले. समाजातील वंचित घटकांसाठी निःस्वार्थ भावनेने सुरू असलेले हे कार्य प्रेरणादायी असून, अशा सेवाभावी संस्थांना समाजातील सर्व स्तरांतून सहकार्य मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्त संस्थेच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सुरेश बिर्जे यांनी उपस्थितांचे आभार मानले, तर श्री. जयप्रकाश प्रभू यांनी  सूत्रसंचालन केले. या भेटीसाठी मोहन आरोंदेकर यांनी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com