मंडणगडात 15 ऑगस्टला अन्नत्याग आंदोलन

मंडणगडात 15 ऑगस्टला अन्नत्याग आंदोलन
Published on

-rat६p८.jpg-
26O55614
मंडणगड ः तहसीलदार अक्षय ढाकणे यांच्याकडे निवेदन सादर करताना राजेश गमरे व कार्यकर्ते.
----
मंडणगडात १५ ला अन्नत्याग आंदोलन
राजेश गमरेंचे निवेदन; आंबेतपूल वाहतुकीस खुला करा
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ६ ः आंबेत–म्हाप्रळ खाडीपुलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून गणेशोत्सवापूर्वी तो वाहतुकीसाठी खुला करावा, या मागणीसह विविध जनहिताच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते राजेश पांडुरंग गमरे यांनी स्वातंत्र्यदिनी (ता. १५) मंडणगड तहसील कार्यालयासमोर सहकाऱ्यांसह अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भातील निवेदन मंडणगड तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री, रत्नागिरी व रायगडचे पालकमंत्री, दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे.
गेल्या काही वर्षांत विविध समस्यांबाबत वारंवार निवेदने देऊन, बैठका होऊन आणि आश्वासने मिळूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. वारंवार होणाऱ्या उपेक्षेमुळे अखेर स्वातंत्र्यदिनीच अन्नत्याग उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे गमरे यांनी स्पष्ट केले. आंबेत–म्हाप्रळ खाडीपुलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून आगामी गणेशोत्सवापूर्वी तो वाहतुकीसाठी खुला करावा तसेच नवीन पुलाच्या उभारणीला गती द्यावी. राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ डीडीच्या दुपदरीकरणात झालेल्या त्रुटींची सखोल चौकशी व्हावी. मंडणगड शहरातील रस्ते, फुटपाथ, गटारे, पादचारी पूल व चौकांचे रुंदीकरण करावे तसेच पार्किंग, सार्वजनिक शौचालये आणि बाजारपेठेचे योग्य नियोजन करावे. ग्रामीण रुग्णालयात पुरेसे डॉक्टर, तज्ज्ञ, वैद्यकीय कर्मचारी, औषध पुरवठा आणि रुग्णवाहिका सेवा तातडीने उपलब्ध करावी. महावितरणचे ‘स्मार्ट वीजमीटर’ रद्द करून जुने पोस्टपेड मीटरच कायम ठेवावेत. छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची उभारणी करावी. दुर्गम वाड्या-वस्त्यांना पक्के रस्ते, रेशनधारकांच्या समस्यांचे निवारण आणि पेट्रोल-डिझेलचा सुरळीत पुरवठा करावा, या सर्व मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन प्रत्यक्ष कार्यवाहीचा अहवाल सादर करावा अन्यथा १५ ऑगस्टपासून सुरू होणारे हे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत मागे घेतले जाणार नाही असे निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com