उपमुख्यमंत्री पवार यांच्याविषयीच्या वक्तव्याचा निषेध

उपमुख्यमंत्री पवार यांच्याविषयीच्या वक्तव्याचा निषेध
Published on

ratchl६१.jpg-
26O55702
चिपळूण ः प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी.
----
सकपाळ यांच्या वक्तव्याचा निषेध
राष्ट्रवादी आक्रमक; जाहीर माफीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ ः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला. याबाबत प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना निवेदन देत प्रदेशाध्यक्ष सकपाळ यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणीही केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी केलेले अवमानकारक व महिलांचा अपमान करणारे वक्तव्य अत्यंत निषेधार्ह आहे. लोकशाही व्यवस्थेत वैचारिक मतभेद असू शकतात; मात्र कोणत्याही महिला लोकप्रतिनिधीचा अवमान करणारी, वैयक्तिक पातळीवर टीका करणारी किंवा अपमानास्पद भाषा वापरणे हे लोकशाही संस्कृतीला शोभणारे नाही, अशा प्रकारची विधाने समाजात चुकीचा संदेश देणारी असून महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारी आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, चिपळूण तालुक्याच्यावतीने या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सकपाळ यांनी आपल्या वक्तव्याबद्दल तत्काळ जाहीर माफी मागावी. भविष्यात अशा प्रकारची बेजबाबदार विधाने टाळावीत, असे निवेदनात नमूद केलेले आहे.
या वेळी पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत खेतले, प्रदेश महिला सरचिटणीस दिशा दाभोळकर, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, जिल्हा परिषद सदस्या नेहा रहाटे, पंचायत समिती सदस्या स्नेहा साळवी, नगरसेवक योगेश पवार, नगरसेविका शेहनाज वांगडे, महिला अध्यक्ष जागृती शिंदे आदी उपस्थित होते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com