

चेतना दिन ११ला साजरा करा
उमेश गिज्जेवार ः मागण्यांसाठी आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ ः राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या जीवनातील ११ ऑगस्ट १९६६ हा दिवस संघर्षाचा आरंभिक टप्पा होता. कर्मचाऱ्यांच्या धैर्यशिलाग्नीला फुंकर या दिवशीच्या राज्यस्तरीय सामूहिक रजा आंदोलनाने घातली गेली. या चेतना दिनाचे पुण्यस्मरण, आजपर्यंत संघटना चळवळीसाठी शक्तिवर्धक ठरले आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ११ ऑगस्टला चेतना दिन साजरा करावा, असे आवाहन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश गिज्जेवार यांनी केले आहे.
मागील आठवड्यात राज्य संघटनेच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे जिल्हाध्यक्ष गिज्जेवार यांनी सांगितले. त्यानुसार ११ ऑगस्ट हा दिवस चेतना दिन महत्त्वाच्या पाच मागण्यांसाठी लक्षवेधी मागणी दिन म्हणून पाळला जाणार आहे. त्याप्रमाणे १ मार्च २०२४ पासून आजपर्यंत सेवानिवृत्त झालेल्या व सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेसाठी विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यांना योजना अंमलबजावणीचा अंतिम आदेश येईपर्यंतच्या कालावधीत तात्पुरते निवृत्ती वेतन देण्यात यावे. चतुर्थश्रेणी व वाहनचालक या पदांसह सर्व रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत. सेवानिवृत्तीची मर्यादा ६० वर्षे करावे. सर्व सरकारी कर्मचारी, सेवानिवृत्ती वेतनधारक, कंत्राटी व रोजंदारी कामगार यांना व्यापक कॅशलेस विमा योजना लागू करण्यात यावी. लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना अपेक्षित वेतनवृद्धीचा लाभ मिळण्यासाठी उपाययोजना करावी. या मागण्यांबाबत ११ ऑगस्टला सर्व शासकीय कार्यालयांच्या प्रांगणात सर्व कर्मचारी एकत्र येऊन घोषणांच्या निनादात मागण्यांचा आग्रह व्यक्त करतील, असे जिल्हाध्यक्षांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.