पूर्णगड शाळेत कांदळवनची ओळख

पूर्णगड शाळेत कांदळवनची ओळख
Published on

-rat६p१३.jpg-
26O55636
पावस ः पूर्णगड शाळेत कांदळवन संदर्भात पुस्तके वितरित करताना.

पूर्णगड शाळेत कांदळवनाची ओळख
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड शाळेत कांदळवन परिसंस्थेची ओळख या संदर्भात ऋतुजा ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर मुलांना या संदर्भातील व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली. कांदळवन जतन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. या वेळी मुलांशी व शिक्षकांशी संवाद साधला. या संदर्भातील पुस्तकही भेट देण्यात आले. या वेळी मुख्याध्यापिका पूर्वा वाकडे, शिक्षक भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाबद्दल केंद्रप्रमुख महेश तोडणकर, शिक्षणविस्तार अधिकारी बीट पावस हिरवे यांनी कौतुक केले आहे.


खेडच्या कुंभारआळीतील पाणीप्रश्न निकाली
खेड ः शहरातील कुंभारआळी येथे उद्‍भवलेला पाणीप्रश्न निकाली काढण्यात नगर प्रशासनाला अखेर यश आले. पाण्याची चिंता मिटल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवडाभरापासून येथील रहिवाशांना पाणीटंचाईमुळे मनस्ताप सहन करावा लागत होता. याबाबत येथील रहिवाशांनी नगरपालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत उपनगराध्यक्ष सतीश चिकणे यांनी नगरसेविका रसिका खेडेकर, नगरसेवक भूषण चिखले व मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्यासह पाणी विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने पाणीप्रश्न निकाली काढला.
----

Marathi News Esakal
www.esakal.com